लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये कार आणि एसटी बसचा भीषण अपघात (accident) झाला आहे. हि धडक एवढी भीषण होती कि यामध्ये कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. उदगीर-नळेगाव रस्त्यावरील हैबतपूर पाटीच्या पुढे हा भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
काय घडले नेमके?
उदगीर आगाराची बस आगारातून चाकूरकडे रवाना झाली होती. दरम्यान, बस हैबतपूर पाटीच्या पुढे आल्यावर तुळजापूर येथून दर्शन घेऊन परत उदगीरकडे येणाऱ्या कारने बसला समोरुन धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील पाचजण जागीच ठार (accident) झाले. तर बसमधील दहाजण जखमी झाले असून त्यांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरु केले. या अपघातातील मृतांची ओळख पटली नसून अपघातास्थळी (accident) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मंगळवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय