1 नोव्हेंबरपासून होणार आहेत ‘हे’ 5 महत्त्वाचे बदल, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर कसा होईल जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ऑक्टोबर महिना उद्या संपत आहे. सोमवारपासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. या दरम्यान, असे अनेक बदल होतील ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होईल. होय… पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून देशभरात अनेक मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होईल. म्हणूनच या नियमांची माहिती तुमच्याकडे अगोदरपासूनच असणे गरजेचे आहे.

1 नोव्हेंबरपासून बँकांमध्ये पैसे जमा करण्यापासून ते पैसे काढण्यापर्यंत शुल्क आकारले जाणार आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल होणार आहे. याशिवाय गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्येही मोठा बदल होणार आहे. अशाच काही गोष्टी पाहूया, ज्या 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहेत.

1. LPG सिलेंडरची किंमत
1 नोव्हेंबरपासून LPG सिलेंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. LPG च्या किमती वाढवल्या जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, LPG च्या विक्रीतील तोटा पाहता सरकार पुन्हा एकदा LPG सिलेंडरच्या किंमती वाढवू शकते.

2. बँकिंग नियमांमध्ये बदल
आता बँकांना पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने याची सुरुवात केली आहे. पुढील महिन्यापासून विहित मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग केल्यास वेगळे शुल्क आकारले जाईल. 1 नोव्हेंबरपासून ग्राहकांना कर्ज खात्यासाठी 150 रुपये भरावे लागणार आहेत. खातेधारकांसाठी तीन वेळा डिपॉझिट्स फ्री असतील, मात्र ग्राहकांनी चौथ्यांदा पैसे जमा केल्यास त्यांना 40 रुपये द्यावे लागतील. दुसरीकडे, जन धन खातेधारकांना यात काहीसा दिलासा मिळाला असून, त्यांना डिपॉझिटवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, मात्र पैसे काढल्यावर 100 रुपये द्यावे लागतील.

3. गाड्यांचे वेळापत्रक बदलेल
भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. याआधी 1 ऑक्टोबरपासून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार होता, मात्र काही कारणांमुळे 31 ऑक्टोबर ही तारीख आणखी निश्चित करण्यात आली आहे. आता 1 नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. यानंतर, 13 हजार पॅसेंजर गाड्या आणि 7 हजार मालगाड्यांच्या वेळा बदलतील. देशात धावणाऱ्या सुमारे 30 राजधानी गाड्यांच्या वेळाही 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहेत.

4. गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी OTP द्यावा लागेल
1 नोव्हेंबरपासून LPG सिलेंडर डिलीव्हरीची संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे. गॅस बुक केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. जेव्हा सिलेंडर डिलिव्हरीसाठी येईल तेव्हा तुम्हाला हा OTP डिलिव्हरी बॉयसोबत शेअर करावा लागेल. हा कोड सिस्टीमशी जुळल्यानंतरच ग्राहकाला सिलेंडरची डिलिव्हरी मिळेल.

5. WhatsApp बंद होईल
1 नोव्हेंबरपासून WhatsApp काही iphone आणि Android फोनवर काम करणे बंद करणार आहे. WhatsApp वर दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरपासून फेसबुकच्या मालकीचे प्लॅटफॉर्म Android 4.0.3 Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 ला सपोर्ट करणार नाही.

Leave a Comment