हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2022-23 संपणार आहे. या दिवशी टॅक्सशी संबंधित अनेक नियमांची देखील सांगता होणार आहे. यामुळे हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. टॅक्सचे असे 5 नियम आहेत, ज्यांची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. या कारणास्तव, कोणत्याही प्रकारचा दंड टाळण्यासाठी हे नियम जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

पॅन आणि आधार लिंकिंग
केंद्र सरकारकडून पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत अनेकदा वाढवली गेली आहे. मात्र आता ती रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे 31 मार्च 2023 ही पॅन आणि आधार लिंक करण्याची शेवटची तारीख असेल. तसेच ज्या व्यक्तींनी अजूनही पॅन आणि आधार कार्ड लिंक केलेले नाहीत, त्यांनी या मुदतीपूर्वी ते लिंक करणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर 1 एप्रिलपासून त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. Income Tax

ऍडव्हान्स टॅक्स भरणे
आर्थिक वर्ष 2022-23 साठी ऍडव्हान्स टॅक्स भरण्याची शेवटची तारीख देखील 31 मार्च 2023 आहे. हे जाणून घ्या कि, ज्या करदात्याचा एका वर्षात अंदाजे टॅक्स 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना त्या आर्थिक वर्षात ऍडव्हान्स टॅक्स भरणे आवश्यक आहे. कलम 234B अंतर्गत, जर करदात्याने 31 मार्चपर्यंत तो भरला नाही तर त्यावर व्याज आकारले जाईल. Income Tax

इन्कम टॅक्स रिटर्न भरणे
जर करदात्यांना कोणत्याही दंडाशिवाय इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल तर आर्थिक वर्ष 2019-20 साठी ही शेवटची वेळ आहे. तसेच, जर तो दाखल केला असेल, मात्र त्यामध्ये काही चूक झाली असेल तर करदात्याने 31 मार्च 2023 पर्यंत ती दुरुस्त करावी. यासाठी सरकारने ‘ITR U’ नावाचा नवीन ITR फॉर्म लाँच केला आहे, ज्यामध्ये ITR वरील डिफॉल्ट्स मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून दोन वर्षांपर्यंत दुरुस्त करता येऊ शकतात. Income Tax

कर बचत गुंतवणूक
कोणत्याही आर्थिक वर्षामध्ये टॅक्स वाचवण्यासाठी करदात्यांकडून विविध कर बचत गुंतवणुकी केल्या जातात. अशा परिस्थितीत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी टॅक्स टाळण्याची ही शेवटची संधी असेल. तसेच ज्या करदात्यांनी जुन्या टॅक्स सिस्टीमची निवड केली आहे त्यांनी चालू आर्थिक वर्षासाठी त्यांची कर बचत गुंतवणूक 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. Income Tax

इलेक्ट्रिक वाहनांवर मिळवा कर सवलत
इन्कम टॅक्सच्या कलम 80EEB अंतर्गत आत्तापर्यंत,वैयक्तिक किंवा व्यावसायिक वापरासाठी कर्जावर खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक वाहनावर भरलेल्या व्याजावर 1.5 लाख रुपयांच्या वजावटीचा दावा केला जाऊ शकतो. मात्र, हा लाभ 31 मार्चनंतर मिळणार नाही. इलेक्ट्रिक वाहनांवर दिलेला हा लाभ 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लागू करण्यात आला आहे. Income Tax
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.incometax.gov.in/iec/foportal/
हे पण वाचा :
आता घरबसल्या Digital Gold वर मिळेल कर्ज, त्यासाठीचे व्याजदर पहा
खुशखबर !!! Ujjawla Yojana अंतर्गत LPG सिलेंडरवरील अनुदानाची मुदत एका वर्षासाठी वाढवली
Bank Holiday : एप्रिलमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची लिस्ट
Bike : दुचाकीचे सेल्फ स्टार्ट खराब झाले तर किक न मारताही कशी सुरू करावी ते जाणून घ्या
खुशखबर !!! आता Bank of Baroda च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया




