हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 9 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ लेखक, विचारवंत हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांच्या जाण्यामुळे संपूर्ण साहित्य क्षेत्राला एक मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर हरी नरके यांच्या नावाने 5 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचे घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. शोध पत्रकार, समाज सुधारक, विद्यार्थी यांना या रकमेतून मदत करण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीचे दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी वाटप समता परिषदेमार्फत करण्यात येईल.
याबाबतची माहिती देताना छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, “मराठी ही संस्कृत, तेलगू आणि कन्नड प्रमाणे अभिजात भाषा आहे. त्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला. भिडे वाड्याचा विषय आला, कोर्टाचा विषय आला की पुरावा हरी नरके द्यायचे. आपल्या सगळ्यांचं फार मोठ नुकसान झालंय. हरी तुम्हाला आम्ही मरू देणार नाही… नेटानं आम्ही काम पुढे नेऊ. समता परिषद त्यांच्या कुचुंबियांच्या मागे असेल. चिंता करण्याचं कारण नाही. हरी नरके यांच्या सगळ्या पुस्तकांचं MET मध्ये ग्रंथालय सुरू करण्यात येईल”
दरम्यान, आज हरी नरके यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला छगन भुजबळ उपस्थित होते. या शोकसभेत बोलताना छगन भुजबळ यांना अश्रू अनावर झाले होते. यानंतर ते हरी नरके यांच्या आठवणीत ढसाढसा रडले. त्यामुळे संपूर्ण सभागृहात शांतता निर्माण झाली. छगन भुजबळ यांनी हरी नरके यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. तसेच हरी नरके यांच्या नावाने शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली.
यावेळी बोलताना त्यांनी, “क्रांती दिनाच्या कार्यक्रमाला ऑगस्ट क्रांती मैदानात होतो. तेव्हा अचानक माझ्या सहाय्यकाने मला कानात येऊन सांगितलं. हरी नरके उद्याच्या कार्यक्रमाला येणार होते. मध्येच वांत्या झाल्या. मी म्हटलं, बरं मी भेटतो त्यांना. ते म्हणाले, हरी गेले. हे ऐकल्यावर माझं डोकच बधीर झालं. मला क्षणभर काहीच सूचनासं झालं. मी म्हटलं अरे काय सांगतो काय हे. ते म्हणाले हो, खरंय. समोरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ताबडतोब नेलं” हा सर्व घडलेला प्रसंग सांगितला.