निवडणुकीपूर्वीच नितीश कुमारांचा लालूंना झटका; ५ आमदारांचा जेडीयूत प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या ३ विधान परिषद सदस्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेडमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर जनता दल यूनायटेड पुन्हा एकदा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. ज्या आरजेडीच्या सदस्यांनी जेडीयूत प्रवेश केला आहे, त्यांमध्ये कमर आलम, संजय प्रसाद, राधाचरण सेठ, दिलीप राय, रणविजय सिंह यांचा समावेश आहे. जनता दल यूनायटेडच्या मुख्य प्रतोदाद्वारे सूचित करण्यात आल्यानंतर सर्व सदस्यांना तत्काळ पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. ही प्रक्रिया अधिकृतपणे करण्यात आली.

मात्र, या प्रवेशाबाबत आरजेडी पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, अधिकतर आमदार तेजस्वी यादव यांच्या व्यक्तीगत कार्यशैलीवर नाराज होऊन नीतीश कुमार यांच्या मागे गेले असल्याचे मानले जात आहे.विधान परिषद सदस्य संजय प्रसाद हे मुंगेरचे खासदार राजीव रंजन ऊर्फ ललन सिंह यांच्या संपर्कात होते, असे सांगितले जात आहे. तर राधाचरण सेठ हे आपल्या वाळूच्या व्यावसायात अडचणीत आल्यामुळे मुख्यमंत्र नीतीश कुमार यांच्या गोटात जाण्याची संधीच शोधत होते असे म्हटले जात आहे. कमर आलम यांना पक्षात कोणी विचारत नसल्याची त्यांची भावना झाल्याने ते गेली अनेक दिवस नाराज होते. मात्र, या घटनेनंतर आता ‘आयाराम-गयाराम’ ची सुरुवात झाली असल्याचे मानले जात आहे. केवळ राष्ट्रीय जनता दलाचेच नाही, तर काँग्रेस पक्षाचेही काही आमदार जनता दल यूनायटेडमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”