नांदेड । नांदेड येथे दर्शनासाठी आलेल्या पांजाबच्या ५ भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता इतर राज्यांतून पंजाबात आलेल्या सर्व नागरिकाची चाचणी करण्याचा निर्णय पंजाब सरकारनं घेतला आहे. सादर नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईनही राहावं लागणार आहे. पंजाबात सापडलेल्या या पाच कोरोना रुग्णांचे नांदेड कनेक्शन समोर आल्यानंतर आता नांदेड मध्ये पण सादर रुग्णांच्या संपर्कात कोणी आले होते का याचा शोध घेतला जात आहे.
राज्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी पंजाब सरकारनं ८० लग्झरी बस नांदेडला पाठवल्या होत्या. नांदेडहून तख्त सचखंड श्री हुजूर साहिबच्या दर्शनासाठी गेलेल्या शीख भाविकांचा एक गट रविवारी सकाळी पंजाबला परतला. हे सर्व मार्च महिन्यापासून नांदेडला गेले होते. अचानक लॉकडाऊन सुरू झाल्यानं हे भाविक तिथंच अडकले होते. पंजाब सरकारनं धाडलेल्या बसमध्ये ५२ प्रवासी प्रवास करू शकतात. परंतु, सोशल डिस्टन्सिंग ध्यानात घेता एका बसमध्ये केवळ ३५ प्रवासी बसवण्यात आले होते.
नांदेडहून परतणाऱ्या ८ रुग्णांपैंकी ५ रुग्ण तरन-तारनमधील सुरसिंह गावातील तर ३ जण कपूरतलाच्या फगवाडाचे रहिवासी आहेत. धक्कादायक म्हणजे, नांदेडहून परतलेल्या भाविकांची सुरसिंह रुग्णालयात स्क्रिनिंगही पार पडली होती. यावेळी त्यांच्यात कोणतीही लक्षणं आढळली नव्हती. प्रशासनाकडून सुरसिंह गाव आणि लाहुका यांना कंन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आलंय. आता या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची तपासणीही केली जाणार आहे.