मराठवाड्यातील 5 प्रकल्पांना पावसाची प्रतीक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मान्सूनचा दीड महिना लोटला असला तरीही जायकवाडीमध्ये पाणी पातळीत फक्त 3 टक्क्यानी वाढ झाली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना या खरीप हंगामाची काळजी वाटत आहे.

सध्या पावसाला सुरुवात झाली असून या 15 दिवसात पाऊस सतत सुरु आहे. यामुळे मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यात अधिक पाऊस झाल्यामुळे जलसाठा 50 ते 70 टक्के एवढा झाला आहे. परंतु काही भागात कमी पाऊस झाल्यामुळे नाथसागर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडीमध्ये 40 पेक्षा कमी जलसाठा उपलब्ध आहे. त्याचबरोबर नगर, नाशिक याठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जायकवाडीत फक्त 3 टक्के वाढ झाली आहे.

पावसाळ्याला सुरुवात झाली परंतु लगेच पावसाने दांडी मारल्यामूळे यंदाच्या खरीप हंगाम वाया जाईल अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. जायकवाडी 35.70 टक्के, निम्न दुधना 84.13 टक्के,येलदरी 65.17 टक्के, सिद्धेश्वर 62.08 टक्के, माजलगाव 29.49 टक्के, मांजरा 21.24 टक्के, पेनगंगा 60.28 टक्के, मानार 76.66 टक्के, निम्न तेरणा 55.79 टक्के, विष्णुपुरी 98 टक्के, शहागड बंधारा 7 टक्के एवढा जलसाठा विविध भागात उपलब्ध झाले आहेत.

Leave a Comment