Tuesday, February 7, 2023

दिवशी घाटात दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू; तीन जण जखमी

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील मरळी- ढेबेवाडी या गावाच्या दरम्यान असणाऱ्या दिवशी घाटात झाड रस्त्यात पडल्याने ते बाजूला करताना दोन दुचाकीवरील चौघांच्या अंगावरती दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मरळी- ढेबेवाडी या मार्गावर गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून चारजण प्रवास करत होते. यावेळी डावरी फाट्यानजीक गावच्या हद्दीत एक झाड रस्त्यातच पडल्याने ते बाजूला करण्याचा प्रयत्न या दोन दुचाकी वरती असलेल्या चौघांनी केला. हा प्रयत्न करत असतानाच तेथे दरड कोसळली, ही दरड या चौघांच्या अंगावर कोसळल्याने ते ढिगार्‍याखाली दबले गेले.

या घटनेची माहिती मिळताच काही लोकांनी त्यांना बाजूला काढले. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,मरळी गावचे माजी सरपंच प्रविण पाटील, रवि साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेत तीनजण जखमी झाले होते. तर एक जण बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी जवळच असणाऱ्या ओढ्यात वाहून गेलेल्या अवस्थेत सापडला आहे.