हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : आता लवकरच मार्च महिना सुरु होणार आहे. यादरम्यान प्रत्येक जण इन्कम टॅक्स भरण्यासाठी माहितीची जुळवाजुळव करत असणार. मात्र हे जाणून घ्या कि, जर आपण वेळेत आपला ITR दाखल केला नाही तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आपल्याला वेगवेगळ्या कलमांतर्गत नोटीसही पाठवली जाऊ शकेल. इथे हे जाणून घ्या कि, छाननी प्रक्रियेचे 2 प्रकार आहेत. यातील पहिला मॅन्युअल आणि दुसरा कंपल्सरी आहे. यातील पहिल्या प्रकारामध्ये काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपल्याला बचत करता येते. मात्र अनेकदा लोकांकडून अशा चुका केल्या जातात ज्यामुळे त्यांचा ITR फॉर्म इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नजरेत येतो. चला तर मग त्यविषयीची माहिती जाणून घेउयात…
ITR न भरणे
Income Tax डिपार्टमेंटकडून आपल्याला आयटीआर न भरल्याबाबत नोटीस पाठवली जाऊ शकेल. जर आपले उत्पन्न स्वीकृत मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आपल्याला ITR भरणे बंधनकारक आहे. जर आपण भारतीय नागरिक असाल आणि आपलाकडे विदेशी मालमत्ता असेल, तरीही त्यातून मिळालेल्या उत्पन्नाची पर्वा न करता ITR भरावा लागेल.
TDS मध्ये चूक
जर आपण रिटर्नमध्ये भरलेला टीडीएस आणि ते भरलेल्या ठिकाणी तफावत असेल, तर आपल्याला नोटीस मिळेल. यासाठी नेहमी खात्री करा की, प्रत्यक्षात किती टीडीएस कापला गेला आणि मगच तो रिटर्नमध्ये टाका. Income Tax
अघोषित उत्पन्न
आपण एका आर्थिक वर्षात जी काही कमाई करतो ती ITR मध्ये घोषित करणे बंधनकारक आहे. बऱ्याचदा लोकांकडून बचत खाते, फिक्स्ड डिपॉझिट्स आणि रिकरिंग डिपॉझिट्सवर मिळणारे व्याज लपवले जाते. याबाबतीत आपल्या बँकेकडून व्याजाचे स्टेटमेंट मागवा आणि ते ITR मध्ये टाका. तसेच त्यामध्ये इतर कोणत्याही स्रोतातून मिळालेल्या उत्पन्नाचा उल्लेख करा. Income Tax
आयटीआर रिटर्न भरण्यात चूक
हे जाणून घ्या कि, अनेकदा लोकांकडून चुकीचा ITR भरला जातो. यामध्ये कधीकधी महत्त्वाची माहिती भरायची राहिली जाते. ज्यामुळे Income Tax डिपार्टमेंटकडून नोटीस पाठवली जाऊ शकेल. हे टाळण्यासाठी, एखाद्या व्यावसायिकाकडून आयटीआर भरून घेता येईल.
हाय व्हॅल्यू ट्रान्सझॅक्शन
जर आपण एखाद्या मोठ्या रकमेचे ट्रान्सझॅक्शन केले तरीही Income Tax डिपार्टमेंटकडून नोटीस मिळू शकेल. जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 5 लाख आहे, मात्र त्याने एका वर्षात 12 लाख रुपये खात्यामध्ये टाकले असतील तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्यावर कारवाई करू शकतो. याबाबत आपल्या प्रत्येक उत्पन्नाचा तपशील सरकारला देणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.incometax.gov.in/iec/foportal/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आजही घसरणीचा कल, पहा आजचे नवीन भाव
Stock Market मधील अप्पर सर्किट अन् लोअर सर्किट काय असते ??? तपासा याचे नियम
Axis Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली पुन्हा वाढ
Charger : आपला फोन रात्रभर चार्जिंगवर ठेवणे कितपत योग्य आहे??? यामुळे बॅटरीचे काय होईल ते जाणून घ्या
Punjab and Sind Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज