नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास शरीरात दिसतात ही लक्षणे; वेळीच व्हा सावध

Vein blockge
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या शरीरामध्ये कोणताही बदल झाला असल्यास शरीर आपल्याला वेळोवेळी त्याचा संकेत देत असते. आपल्या संपूर्ण शरीरात शिरा पसरलेल्या असतात. या शिरा रक्त सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असतात. अशा वेळी तुमच्या मज्जातंतूचे कार्य चांगल्या पद्धतीने पार पडणे खूप गरजेचे असते. जर तुमच्या मजातंतूमध्ये कोणताही प्रकारची समस्या आढळली, तर त्याचा परिणाम तुमच्या शरीराच्या प्रमुख अवयवांवर होऊ शकतो.

जर तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले, तर शरीर आपल्याला वेळोवेळी त्याबाबतचे संकेत देत असतात. याबाबतची कारण देखील वेगळी असतात. जसे की तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी, शारीरिक हालचालीचा अभाव, लठ्ठपणा वाढत जातो, उच्च कॉलेस्ट्रॉल, धुम्रपान यांसारख्या गोष्टीमुळे तुमच्या शिरा बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्त हृदयापर्यंत नीट पोहोचत नाही. आणि हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे शरीर आपल्याला काही संकेत देत असतात. त्यावेळी त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

छातीत दुखणे

जेव्हा एखाद्या व्यक्तीला सतत छातीमध्ये दुखते किंवा जडपणा जाणवतो, यावेळी शिऱ्यांमध्ये अडथळा निर्माण झालेला असतो. म्हणजेच पुरेसा ऑक्सिजन तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे छातीमध्ये दुखते.

श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे

तुमच्या नसांमध्ये जर बिघाड झाला तरी, देखील तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या ब्लॉकेजमुळे तुमच्या शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो, अशा काही समस्या जाणवल्या, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

तीव्र थकवा आणि अशक्तपणा

तुम्हाला जर वारंवार थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर हे देखील शिरांमध्ये अडथळा निर्माण होण्याचे एक लक्षण आहे. जर तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला तर हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला सारखे थकल्यासारखे आम्ही अशक्तपणा वाटते. जर तुम्हाला अशा प्रकारचे लक्षण दिसत असेल तरी देखील डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

वारंवार चक्कर येणे

वारंवार चक्कर येणे हे देखील नसांमध्ये अडथळा येण्याचे एक प्रमुख लक्षण आहे ते ब्लॉकेजमुळे मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही त्यामुळे तुम्हाला चक्कर येते अनेक वेळा माणसं जास्त वेळ बेशुद्ध अवस्थेत देखील सापडतात.