हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Saving Account : एकाच बँकेत किंवा वेगवेगळ्या बँकांमध्ये अनेक खाती असल्याचा काही वेळा फायदा होऊ शकतो. साधारणतः जास्त व्याजदर मिळविण्यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या बँकांमध्ये बचत खाती उघडली जातात. मात्र एका मर्यादेनंतर ही सर्व खाती सांभाळणे फार अवघड होऊन जाते. यामध्ये बऱ्याचदा किमान रक्कम न राखल्याने बँका शुल्क आकारतात. अशा परिस्थितीत लोकांकडून वापरात नसलेली खाती बंद केली जातात.
लोकांकडून अनेकदा आपल्या खात्यातून सर्व पैसे काढून ते खाते आहे तसेच सोडून दिले जाते. मात्र हे लक्षात घ्या कि, अशा परिस्थितीतही बँकांकडून खात्यासाठी मेंटेनन्स चार्ज, एटीएम चार्ज आकारले जातात. त्यामुळे वापरात नसलेली अशी खाती पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. जर आपल्याकडेही एकापेक्षा जास्त बचत खाती असतील तर ते खाते बंद करताना काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घ्या… Saving Account
खात्यातील बॅलन्स तपासा आणि स्टेटमेंटची नोंद ठेवा
हे लक्षात घ्या कि, आपण बंद करणार असलेल्या बचत खात्यातील बॅलन्स तपासा, स्टेटमेंट डाउनलोड करा. तसेच किमान गेल्या 2-3 वर्षांच्या स्टेटमेंटची नोंद आपल्याकडे ठेवा. जर भविष्यात आपल्याला या खात्याद्वारे केलेल्या कोणत्याही व्यवहाराविषयीची माहिती हवी असेल तर ते खूप उपयुक्त ठरेल. याबरोरबच इन्कम टॅक्स रिटर्न भरतानाही उपयुक्त ठरते. Saving Account
उर्वरित रक्कम भरा
जर आपल्या खात्यातील बॅलन्स मायनस मध्ये असेल तर बँकेकडून खाते बंद करू दिले जाणार नाही. मिनिमम बॅलन्स आणि इतर सर्व्हिस चार्ज किंवा मेन्टनन्स चार्ज न दिल्यामुळे आपल्या खात्यातील बॅलन्स मायनस असू शकतो. हे लक्षात घ्या कि, आपल्या बचत खात्यातील नकारात्मक आकडेवारीचा परिणाम क्रेडिट स्कोअरवरही होतो. त्यामुळे खाते बंद करण्यापूर्वी सर्व पेमेंट करा. Saving Account
ऑटो पे सुविधा बंद करा
जर आपण ऑटो-पे द्वारे ईएमआय, बिले आणि मंथली सब्सक्रिप्शनसाठी पेमेंट करत असाल तर त्याच्याशी संबंधित सर्व ऑटो-पे ट्रान्सझॅक्शन थांबवा. मात्र असे केले नाही तर आपले महत्त्वाचे पेमेंट थांबू शकेल. यामुळे भविष्यात क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकेल. Saving Account
अकाउंट क्लोझर चार्ज कसा टाळावा ???
अनेक बँकांकडून खाते बंद करण्यासाठी क्लोझर चार्ज आकारला जातो. जर बचत खाते एक वर्षाच्या आत बंद झाले तर बहुतेक बँका त्यासाठी शुल्क आकारतात. त्यामुळे क्लोझर चार्ज टाळण्यासाठी खाते बंद करण्यासाठी किमान एक वर्ष वाट पहावी. Saving Account
सर्व ठिकाणी खाते अपडेट करा
आपल्याला जे बचत खाते बंद करायचे आहे ते ईपीएफओ, इन्शुरन्स पॉलिसी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि इतर सरकारी बचत योजनांशी जोडले गेलेले असू शकते. त्यामुळे आपले खाते बंद करण्यापूर्वी अशा सर्व सेवा आणि बचत योजनांमध्ये नवीन खात्याचे तपशील अपडेट करावेत. यामुळे या योजनेचे फायदे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यास मदत होईल. Saving Account
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/accounts/saving-account
हे पण वाचा :
Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का??? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Multibagger Stocks : ‘या’ 3 केमिकल कंपन्यांच्या शेअर्सनी दिला 800% रिटर्न !!!
Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या स्पॉट किंमतीत जोरदार वाढ, आजचे दर पहा
Post Office च्या ‘या’ बचत योजनेत मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, Garib Kalyan Yojana चा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवला