Thursday, March 30, 2023

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 5 वर्षे सक्तमजुरी

- Advertisement -

कराड | अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी आरोपीस 5 वर्षे सक्तमजूरी व 6 हजार रूपयाची दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी शिक्षा सुनावल्याची माहिती सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी शहा यांनी दिली.

याबाबतची माहिती अशी, कराड तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार आरोपीने 1 एप्रिल 2016 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास काटकरमळा नावचे शिवारात अल्पवयीन मुलीवर अत्याचर करण्यात आला होता. त्यामुळे आरोपी विरुद्ध सदरची तक्रार दाखल करण्यात आली. यामध्ये सरकार पक्षातर्फे सहा जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी शहा यांनी एकूण 5 साक्षीदार तपासले आहेत. सदरच्या खटल्यात सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक दिपिका जाैंजाळ यांनी घटनेचा तपास केला. कोर्टात गुन्हा शाबीत झाल्याने आरोपीस पोक्सो कलम 9 अनव्ये 5 वर्षे सक्त मजूरी व रु. 2 हजार रूपयांची द्रव्यदंडाची, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

- Advertisement -

खटला दरम्यान सरकार पक्षातर्फे युक्तीवाद करते वेळी व खटला चालविते वेळी अँड. ऐश्वर्या यादव, अँड. संध्या चव्हाण, व अँड. कोमल लाड यांनी सहा. जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी शहा यांना मदत केली. तसेच कोर्ट पैरवी प्रासुकेशन स्कॉड चे कराड कोर्टातील कोर्ट ड्युटीचे पो. नाईक आर. जी. गोरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना पाटील यांनी सहकार्य केले.