धक्कादायक! कोरोनापासून  वाचण्यासाठी ५० पेक्षा जास्त मुलांना वाटली दारू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ओडिशा ।  कोरोनाची भीती ही  दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील  रुग्णांबरोबर  मृतांचा आकडा ही वाढत आहे.  अश्यातच  लोकांकडून  कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक वेगवेगळ्या  घरगुती  उपायांना महत्त्व दिले जाते. असाच काहीसा  धक्कादायक उपाय ओडिशा  राज्यात  वापरला आहे. कोरोनाच्या  साथी पासून वाचण्यासाठी तेथील १० त१२ वर्ष असलेल्या ५० पेक्षा जास्त लहान मुलांना दारू दिली गेली आहे. हा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला आहे.  त्यामुळे सर्वत्र  संतापाची लाट उसळली आहे.

हि घटना ओडिशा  राज्यातील   मालकांगिरी जिल्यात असलेल्या पारसनपाली या गावातील आहे. तेथील ग्रामीण लोकांच्या म्हणण्यानुसार  देशी दारूचे म्हणजे   एहतीहान सालपा चे  सेवन केल्यास कोरोनाचे संक्रमण होऊ शकत नाही. ते रोखण्यासाठी मदत होऊ शकते. सोशल मीडियावर जो  व्हिडीओ वायरल होत आहे त्यामध्ये1 तेथील स्थानिक लोक 10 ते 12  वर्षांमध्ये असलेले 50 लहान मुलांना वाटली जात आहे. त्यातील ना कोणी मास्क घातले आहे ना कोणी सोशल  डिस्टनस चे पालन केले गेले आहे.

या व्हिडीओ वर समजतील अनेक स्तरावरील  लोकांनी टीका केली आहे. बालरोग तज्ञ डॉक्टर अरजित महापात्र यांच्या म्हणण्यानुसार अल्कोहोल च्या सेवनाने कोरोनाची लागण होत नाही ही मुळात अंदाश्रद्धा आहे.  त्यांच्या सेवनाने कोरोना  आजार बरा होत नाही.  कोरोना हा तोंड, नाक आणि डोळे यांच्या माध्यमातून जर विषाणूने प्रवेश केला तरच कोरोना  होतो किंवा कोरोना झालेल्या व्यक्ती कडू न एखादी गोष्ट घेतल्याने त्याचे  विषाणू हे नाकावाटे शरीरात जातात.  दारू हा त्याच्यावरच उपाय नाही  दारू पिल्याने कोरोना होत नाही हा लोकांचा   संभ्रह आहे. या बरोबर  लहान मुलांना दारू देणं हा सुद्धा मोठा अपराध आहे.