लॉकडाऊन काळात शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती अनिवार्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद: जिल्ह्यात 11 मार्च 14 एप्रिल दरम्यान अंशतः लॉकडाऊन घोषित झाला आहे. या काळात प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती व ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामूळे सर्व शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील. परंतू ऑनलाईन कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

10 वी व 12 वीची प्रात्यक्षिक परीक्षा व 8वी साठी आयोजित राष्ट्रिय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ठरलेल्या नियोजना नुसार घ्यावी. 50 टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन अध्यापन करावे. शिक्षकांनी स्टाफ रूम किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊ नये.

प्राथमिक व उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालये तसेच सर्व जि.प.प्रशाला व प्राथमिक शाळांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment