परभणी हादरलं ! रुग्णालयाच्या गेटसमोरच कामगाराची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या

परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणीच्या सेलु उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रुग्णालयाच्या गेटवर एका कामगाराची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयाच्या गेटवर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांना आढळून आले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हि घटना उघडकीस येताच डॉक्टरांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून त्या ठिकाणचा पंचनामा केला. रुग्णालयाच्या गेटवरच हि हत्या झाल्याने रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

विशाल सदाफळे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मूळचे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या ठिकाणचे रहिवाशी होते. मृत विशाल सदाफळे हे सेलू येथील एका हॉटेलात काम करत होते. घटनेच्या दिवशी मध्यरात्री काही अज्ञात लोकांनी त्यांची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केली. यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी सेलु उपजिल्हा रुग्णालयात काही डॉक्टर ड्युटीवर येत असताना सेलु रुग्णालयाच्या ओपीडी गेटसमोर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे डॉक्टरांना आढळले.

यानंतर डॉक्टरांनी या घटनेची माहिती तातडीने सेलु पोलिसांना दिली. यानंतर सेलु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर पोलिसांनी मृतांची ओळख पटवून विशाल सदाफळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत विशाल सदाफळे यांची हत्या कोणी आणि कोणत्या कारणातून केली? याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. हि हत्या पूर्ववैमनस्यातून केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस या घटनेचा सर्व बाजुंनी तपास करत आहेत.