5000 Rupee Note: RBI लवकरच 5000 रुपयांची नोट जारी करणार ?

5000 Rupee Note
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 5000 Rupee Note – देशात सध्या 5000 रुपयांच्या नोटेची एक बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या बातमीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 5000 रुपयांची नवी नोट जारी करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या पोस्टसोबत एका नोटेचा फोटोही शेयर केला जात आहे. मात्र, पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटने या दाव्याबाबत महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. तर चला या 5000 रुपयाच्या नोटेची बातमी खरी आहे कि खोटी हे पाहुयात.

सोशल मीडियावर 5000 रुपयांची नवी नोट (5000 Rupee Note) –

व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, आरबीआय लवकरच 5000 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे. या पोस्टसोबत नोटेचा फोटोही जोडण्यात आला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ही पोस्ट शेअर केली असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. पण पंतप्रधान माहिती ब्यूरोच्या (PIB) फॅक्ट चेक युनिटने या व्हायरल पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. पीआयबीने सांगितले आहे कि 5000 रुपयांची (5000 Rupee Note) कोणतीही नवी नोट जारी करण्याचा निर्णय आरबीआयने घेतलेला नाही. ही बातमी पूर्णपणे फेक आहे. तरी अशा चुकीच्या माहितीला बळी पडू नका.

सध्या भारतात कायदेशीर नोटा –

सध्या भारतात 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर आहेत. मात्र, 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. आरबीआयने (Reserve Bank of India) लोकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या कडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्यात. सरकारच्या फॅक्ट चेक यंत्रणेने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणतीही बातमी व्हायरल झाल्यावर तिची सत्यता आधी तपासा. अशा अफवांवर विश्वास ठेवणे टाळा.