कराडातील ५४ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे दाखल असणाऱ्या ५४ वर्षीय कोरोना (कोविड-19) बाधित रुग्णांचा आज पाहटे ५ वाजता मृत्यु झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु हा कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यातील कोराना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५०० पार गेली असताना आता सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. काल कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एका युवकाचा रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ वर पोहोचली आहे.