हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, एकविसाव्या शतकात प्रत्येक जुन्या गोष्टीने कात टाकत नवीन रूप धारण केले आहे. मातीची घरं जाऊन सिमेंटची पक्की घर आली . टेलिफोनची जागा आता मोबाईलने घेतली आहे. शतकात बदलांच्या मालिकांचा जणू सपाटाच लावला आहे. सध्या इलेक्ट्रिक वस्तूंमध्येही क्रांती घडत आहे अगदी रेडिओपासून ते आतापर्यंच्या स्मार्ट TV पर्यंत सारे काही पालटले आहे. जर तुम्ही नवा स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर हार्डवेअर स्टार्टअप कंपनी Telly हि कंपनी ग्राहकांना अगदी फुकट मध्ये 55 इंचाचा Smart TV देत आहे.
कंपनीचे सह-संस्थापक llya Pozin यांनी याबाबत सांगताना म्हंटल की, ते 5 लाख लोकांना मोफत स्मार्ट टीव्ही देणार आहेत. यामागे आपल्या ब्रँडचा प्रचार, प्रसार करणे आणि मोफत स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून आपले उत्पादन लोकांसमोर दाखवणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत $1000 (80 हजार रुपये) आहे. परंतु ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तुम्ही www.freetelly.com वरून हा मोफत स्मार्ट टीव्ही बुक करू शकता. सध्या कंपनीने ही ऑफर फक्त अमेरिकेत आणली आहे. पण लवकरच कंपनी इतर देशांमध्येही असे मोफत स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.
काय आहे खास
Telly कंपनीचा 55 इंचाचा स्मार्ट TV हा एक ड्युएल स्मार्ट स्क्रीन TV आहे. हा TV 4K HDR ला सपोर्ट करतो. यामध्ये पाच इनबिल्ट साऊंड बार बसवण्यात आले आहेत ज्यामुळे टीव्हीचा आवाज एकदम खणखणीत ऐकू येतो. यामधील दुसरी स्क्रीन हि सतत जाहिराती,संगीत आणि अन्य फीचर्स चा आनंद घेत ग्राहक या TV चा मनमुराद आनंद लुटू शकतील . तसेच एका स्क्रीनवर जेव्हा तुम्ही सिनेमाचा आनंद घेत असाल तेव्हा दुसरी स्क्रीन तुम्हाला तुम्ही सेट केलेल्या मॅचचा स्कोर दाखवेल. Telly कंपनीच्या कॉलिंग फीचर्स चा उपयोग करून ग्राहक आपल्या मित्रमंडळींसोबत व्हिडीओ चॅट करू शकतात त्यासाठी इनबिल्ट कॅमेरा मायक्रोफोन आणि सेन्सरची सुविधाही सदर TV त देण्यात आली आहे. TV च्या दुनियेत Telly कंपनीने सादर केलेले आपले हे उद्पादन नक्कीच संपूर्ण दुनियेला भुरळ घालेल ह्यात शंकाच नाही .