देशात कोरोनाबाधितांची संख्या २६ लाखांच्या पार; २४ तासांत आढळले ५७,९८२ नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसचा देशातील वाढणारा प्रादुर्भाव दिवसागणिक चिंता आणखी वाढवत आहे. कुठे कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचं चित्र दिसत असतानाच लगेचच रुग्णसंख्येत होणारी वाढ प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यापुढं आव्हानं उभी करत आहे. अशा या परिस्थितीमध्ये भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतच असल्याचे चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ५७,९८२ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या आता २६ लाखांच्या पार पोहोचली आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २६ लाख ४७ हजार ६६४ झाली आहे. यांपैकी ५० हजार ९२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ लाख १९ हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. ६ लाख ७६ हजार ९०० एक्टिव रुग्ण आहेत. कोरोना संक्रमितांच्या संख्येच्या हिशोबानं भारत जगातील तिसरा सर्वाधिक बाधित देश बनला आहे. देशात १६ ऑगस्टपर्यंत एकूण तीन कोटी ४१ हजार ४०० नमुन्यांची चाचणी झाली आहे. रविवारी एका दिवसात ७ लाख ३१ हजार ६९७ नमुन्यांची चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”