हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 23 मे रोजी होणारी परीक्षा लांबणीवर टाकली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
Given the prevailing Corona virus pandemic, Maharashtra State Council of Examination's Pre-Upper Primary Scholarship (Class V) & Pre-Secondary Scholarship (Class VIII) examinations scheduled to be held on May 23, 2021 have been postponed till further notice. pic.twitter.com/RSS4GtZGFG
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) May 10, 2021
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागानं 23 मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता आताही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.