सातारा | सातारा जिल्ह्याला रविवारी वादळी वाऱ्यासह झोडपले. या पावसामुळे मायणी येथे बाजार पटांगण शेजारी खाजगी मालकाच्या बंद घराची भिंत कोसळून 6 जण जखमी झाले आहेत. तर मायणीतच बसस्थानकात एक मोठे झाड कोसळल्याने अनेक दुचाकीचे नुकसा झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही काही दिवस सातारा जिल्ह्यात पावसा
सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, खटाव, माण तालुक्याला वादळी वाऱ्याने झोडपले. कराड- सातारा मार्गावरही अनेक ठिकाणी वाहतूकीचा खोळंबा झालेला दिसून आला. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना अचानक आलेल्या पावसाने दिलासा दिला.
मायणी तालुका खटाव येथे आज झालेल्या वादळी पावसामुळे बाजार पटांगणावर भिंत कोसळून सहा जण गंभीर जखमी झाले. तर परिसरात वृक्ष उन्मळून पडल्याने दुचाकी वाहने पानटपऱ्या त्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान या घटनेत जखमी झालेल्यांना कराड सातारा येथे उपचारासाठी दाखल केले आहे
जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे
मायणी बाजारपेठेत भिंत अंगावर पडल्याने सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. सुजाता पिलाजी दगडे (वय 56, मायणी), भगवान पांडुरंग भोसले (वय 59), आशाबाई भगवान भोसले (वय 52, दोघे रा. वरकुटे, ता. माण) रंगूबाई तानाजी निकम (वय 55, रा. गुंडेवाडी), संगीता संजय मोरे (वय 57, रा. निमसोड), सपना सोमनाथ लुकडे (वय 32 रा. मायणी) अशी जखमींची नावे आहेत.