हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : गेल्या 1 वर्षात बीएसई सेन्सेक्सने 14 टक्क्यांनी तर निफ्टी 50 ने 11.65 टक्क्यांनी झेप घेतली आहे. यादरम्यान निफ्टी स्मॉलकॅप 100-TRI जवळजवळ सपाट पातळीवरच राहिला. मात्र, काही वैयक्तिक स्मॉल कॅप शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे.
आज आपण गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या काही स्मॉलकॅप शेअर्सबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. हे जाणून घ्या कि, या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडांनीही प्रचंड विश्वास दाखविला आहे. चला तर मग एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणाऱ्या काही शेअर्सबाबतची माहिती जाणून घेउयात…
Apollo Micro Systems
या शेअर्स एका वर्षाच्या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. वर्षभरात या शेअर्समध्ये 158 टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्वांट स्मॉल कॅप फंडाचे पैसेही या स्टॉकमध्ये गुंतवले जात आहेत. Multibagger Stocks
Kirloskar Oil Engines
गेल्या एका वर्षात हे शेअर्स 155 टक्क्यांनी उडी घेऊन 321.90 रुपयांवर पोहोचले आहेत. यामध्ये फ्रँकलिन इंडिया अपॉर्च्युनिटीज, महिंद्रा मॅन्युलाइफ मल्टी कॅप आणि IDBI स्मॉल कॅपसहीत 25 ऍक्टिव्ह स्कीम्सने आपले पैसे गुंतवले आहेत. Multibagger Stocks
Safari Industries
या कंपनीचे शेअर्सदेखील अशा स्मॉल कॅप शेअर्सपैकी एक आहे ज्यांनी एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. गेल्या एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 141 टक्के रिटर्न मिळवून दिला आहे. वर्षभरापूर्वी 855.20 रुपयांवर असलेले हे शेअर्स आता 2,061 रुपयांच्या पातळीवर आहेत. सुंदरम कंझम्पशन, युनियन स्मॉल कॅप आणि डीएसपी स्मॉल कॅपसहीत 12 ऍक्टिव्ह MF स्कीम्सने आपले पैसे या शेअर्समध्ये गुंतवले आहेत. Multibagger Stocks
Power Mech Projects
NSE वर या कंपनीच्या शेअर्समध्ये एका वर्षात 178 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी 859 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 2,394 रुपयांच्या पातळीवर आहेत. एचएसबीसी बिझनेस सायकल्स, एचडीएफसी स्मॉल कॅप आणि एचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चरनेही यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. Multibagger Stocks
Elecon Engineering Company
गेल्या एका वर्षापासून हे शेअर्स गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून देत आहेत. या शेअर्सने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 162 टक्के रिटर्न मिळवून दिला आहे. एका वर्षापूर्वी NSE वर 147.40 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 386.85 रुपयांच्या पातळीवर आहेत. एलआयसी म्युच्युअल फंड फ्लेक्सी कॅप, एलआयसी म्युच्युअल फंड चिल्ड्रन गिफ्ट आणि एचडीएफसी मल्टी कॅप यांनीही या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. Multibagger Stocks
Rama Steel Tubes
गेल्या एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 148% रिटर्न दिला आहे. गेल्या एका वर्षात हे शेअर्स 12.71 रुपयांवरून 32 रुपयांपर्यंत वाढले आहेत. क्वांट व्हॅल्यू फंडाने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/rama-steel-tubes-ltd/ramasteel/539309/
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने अवघ्या 1 महिन्यात शेअरधारकांचे पैसे केले दुप्पट !!!
Kotak Mahindra Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदर 50 Bps ने वाढवले
Lunar Eclipse : वर्षातील पहिले चंद्रग्रहण ‘या’ दिवशी होणार, जाणून घ्या त्याविषयीची महत्त्वाची माहिती
आपल्यामागे Satish Kaushik यांनी सोडली कोट्यवधींची संपत्ती, दर महिन्याला कमावायचे इतके पैसे
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, पहा आजचे नवीन भाव