Kotak Mahindra Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदर 50 Bps ने वाढवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kotak Mahindra Bank: RBI कडून रेपो दरात आतापर्यंत अनेकदा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता खासगी क्षेत्रातील Kotak Mahindra Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात 50 बेस पॉईंट्सपर्यंतची वाढ केली आहे.

Kotak Mahindra Bank Q2 net profit falls 7%, asset quality improves | Mint

 8 मार्च 2023 पासून नवीन दर लागू

Kotak Mahindra Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 8 मार्च 2023 पासून लागू होणार आहेत. या बदलानंतर आता बँक सामान्य गुंतवणूकदारांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD वर 2.75% ते 6.20% पर्यंत व्याज मिळू शकते, तर ज्येष्ठ नागरिकांना 3.25% ते 6.70% पर्यंत दर मिळू शकतात. सध्या, कोटक महिंद्रा बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी कमाल 7.20% आणि 390 दिवस (12 महिने 24 दिवस) ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.70% व्याजदर देते.

Kotak Mahindra Bank Q2 Results: Net Profit Rises 27%, Beats Estimates

Kotak Mahindra Bank च्या एफडीचे नवीन दर

Kotak Mahindra Bank 7-14 दिवसांच्या FD वर 2.75% तर 15-30 दिवसांच्या FD वर 3.00% , 31-45 दिवसांच्या FD वर 3.25%, 46-90 दिवसांच्या ठेवींवर 3.50%, 91-120 दिवसांच्या FD वर 4.00%, 121-179 दिवसांच्या FD वर 4.25% व्याजदर देईल.

याशिवाय, कोटक महिंद्रा बँकेने 180 दिवसांच्या देशांतर्गत FD वरील व्याजदरात 50 बेस पॉईंट्सनी वाढ करत 6% वरून 6.50% केला आहे. तसेच आता बँक 181 दिवस ते 363 दिवसांच्या FD वर 6.00%, 364 दिवसांच्या FD वर 6.25%, 365 दिवस ते 389 दिवसांच्या FD वर 7.00% व्याजदर देईल.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.”

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/personal-banking/deposits/fixed-deposit/fixed-deposit-interest-rate.html

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे