हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वेला याचा चांगला फायदा होताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला देशभरात “वंदे भारत एक्सप्रेस” (Vande Bharat Express) ही लोकप्रिय बनली आहे. यात वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास आणखीच सुलभ आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे विभाग विविध प्रयोग करताना दिसत आहे. आणखीन खास गोष्ट म्हणजे, वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) लोकप्रियता बघून महाराष्ट्राला आणखीन सहा वंदे भारत एक्सप्रेस मिळू शकतात अशी माहिती समोर आली आहे.
वंदे भारत कोणत्या मार्गांवर धावणार(Vande Bharat Express)
एका मीडिया रिपोर्टनुसार, भविष्यात महाराष्ट्रात आणखीन सहा वंदे भारत एक्सप्रेस धावू शकतात. सध्याच्या घडीला वंदे भारत एक्सप्रेस प्रती दिवसेंदिवस प्रवशांची लोकप्रियता वाढत चाललेली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात आणखीन 6 वंदे भारत एक्सप्रेस धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या एक्स्प्रेस पुणे ते शेगाव, मुंबई ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, मुंबई ते कोल्हापूर अशा मार्गांवर धावतील. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखीन सुलभ होईल.
महाराष्ट्रात धावणाऱ्या सहापैकी एक वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर चालवली जाणार आहे. ही एक्सप्रेस ट्रेन पुण्यामार्गे धावेल. म्हणजेच पुढील काळात पुणेकरांना एक्सप्रेसची भेट मिळेल. दरम्यान, सध्या देशात 51 मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस हाय स्पीडने सुरू आहे. यातील आठ मार्ग महाराष्ट्रातील आहेत. या मार्गात मुंबई ते नागपूर मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, अशा इतर अनेक महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. यात आता लवकरच आणखीन 6 मार्गांचा समावेश होणार आहे.