बाळाचा जन्म होताच आईला मिळणार 6 हजार रुपये; जाणून घ्या सरकारच्या ‘या’ योजनेविषयी

Matru Vandana Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महिलांसाठी सरकारकडून अनेक विविध योजना राबवल्या जातात. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे मातृत्व वंदन योजना (Matru Vandana Yojana) होय. या योजनेअंतर्गत बाळ झाल्यानंतर आईला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. ही योजना सध्या महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे. पात्र महिलांना योजनेअंतर्गत हप्त्यामध्ये ही रक्कम देण्यात येते. त्यामुळे या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतात? योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

कोणाला मिळणार लाभ?

मातृत्व वंदन योजनेचा महिलेच्या कुटुंबातील इतर सदस्यांना लाभ घेता येत नाही. देशभरामध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यामुळे याला थांबवण्यासाठी सरकारकडून मातृत्व वंदन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून गर्भवती महिलांसाठी आर्थिक मदत पोहोचवली जाते. या योजनेची रक्कम तब्बल सहा हजार रुपये आहे. एखाद्या महिलेला मूल झाल्यानंतर सरकार 6 हजार रुपये त्या मुलाच्या पोषणासाठी आणि आजारपणासाठी आईला देते.

ऑनलाइन अर्ज करावा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. अर्ज केलेल्या महिलांना तसेच पात्र महिलांना तीन टप्प्यांमध्ये ही रक्कम देण्यात येते. शेवटच्या टप्प्यात महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर 2 हजार रुपये तिच्या खात्यावर टाकण्यात येतात. योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 2 हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये महिलांना देण्यात येतात. ही रक्कम केंद्र सरकारकडून गर्भवती महिलांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात येते.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ज्या गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती जाणून घ्यावी आणि येथे देण्यात येणारा फॉर्म डाऊनलोड करून कार्यालयात जमा करावा. किंवा ऑनलाईन पद्धतीने भरून टाकावा.

योजनेसाठी पात्र कोण?

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय वय 18 ते 55 या दरम्यान असायला हवे. एखाद्या महिलेला दुसरे अपत्य झाल्यानंतर 270 दिवसात अर्ज करावा.