काय सांगता! मूल जन्माला येताच मिळतात 63 लाख रुपये; या कंपनीची खास ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तुम्ही जर कोणत्या कंपनी मध्ये काम करत असाल तर तुम्ही दिवाळी बोनस, किंवा दसऱ्याला बोनस भेटल्याचे अनुभवलं असेल. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जवळपास सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांना बोनस ऑफर करत असतात. परंतु तुम्ही मूल जन्माला घातल्यास कंपनी कडून पैसे मिळत असल्याचे कधी ऐकलं आहे का? पण हे खरं आहे. जगाच्या पाठीवर अशाही काही कंपन्या आहे ज्या मूल जन्माला घातल्यास कर्मचाऱ्याला थोडाथोडका नव्हे तर तब्बल 63 लाख बोनस देत आहे. या कंपन्या नेमक्या आहेत तरी कुठे ? आणि इतका बोनस ती का देत आहे याबाबत आज आपण जाणून घेऊयात…..

तर मित्रानो, आपण ज्या कंपनीबद्दल बोलतोय त्या कंपन्या दक्षिण कोरियात आहेत. या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी मूल जन्मास घातल्यास इतका मोठा बोनस का देत आहेत यामागील कारणही रंजक आहे. खरं तर एका अहवालानुसार, दक्षिण कोरियामध्ये पुढील काही वर्षांत देशाचा जन्मदर विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचू शकतो, ज्यामुळे तेथील लोकसंख्याशास्त्रीय आव्हाने आणखी बिघडू शकतात. दक्षिण कोरियातील प्रजनन दर हा जगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहे. अशा स्थितीत अधिकाधिक मुले जन्माला घालणे हे दक्षिण कोरियाची मुख्य गरज आहे. यासाठी देशातील अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यानुसार, दक्षिण कोरियाच्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना मुले जन्माला घालण्यासाठी $75,000 म्हणजेच भारतीय चलनानुसार, 62,16,435 रुपयांपर्यंतचा बोनस देत आहेत. Booyoung Group आणि Ssangbangwool या दोन कंपन्यांनी या महिन्यात त्यांच्या कार्यालयात नवीन जन्म कार्यक्रम जाहीर केले आहेत. बिझनेस इनसाइडरच्या वृत्तात द कोरिया हेराल्डचा हवाला देत असे म्हटले आहे की अंडरवेअर उत्पादन कंपनी Ssangbangwool ने गेल्या गुरुवारी एक निवेदन जारी केले की ते आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पहिल्या मुलासाठी $ 22,400 (सुमारे 18 लाख) देईल. दुसऱ्या मुलासाठी $22,400 (सुमारे 18 लाख रुपये) देईल. तिसऱ्या अपत्यासाठी $30,000 (सुमारे 25 लाख रुपये) बोनस देत आहे. कंपनीच्या प्रवक्त्यानुसार, कमी जन्मदर नियंत्रित करणे हे आपल्या समाजासाठी सर्वात महत्त्वाचे काम बनले आहे. या उपक्रमात कंपनी जबाबदारी घेईल आणि देशातील प्रजनन दर वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.