7/12 संगणकीकरणात आजरा तालुका पुणे विभागात प्रथम

0
34
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
भुदरगड उपविभागातील आजरा तालुक्याने एकूण 55 हजार 28 सातबाऱ्यांचे संगणकीकरण पूर्ण करुन पुणे महसूल विभागात प्रथम क्रमांक घेतला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी व तहसिलदार विकास अहिर यांच्यासह तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी, अव्वल कारकून व तलाठी यांनी नियोजनबध्द आणि कौतुकास्पद काम केले आहे.

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ई-महाभूमी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये 7/12 संगणकीकरणाचे कामाचा सर्व तालुक्यामध्ये वेग घेतला असून एकूण 10 लाख 77 हजार 30 सातबाऱ्यांपैकी 10 लाख 39 हजार 46 (96.47%) सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. तालुकानिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे- आजरा – 100टक्के, भुदरगड – 99.75 टक्के, राधानगरी – 99.70 टक्के, कागल – 99.56 टक्के गडहिंग्लज – 99.47 टक्के, चंदगड – 99.23 टक्के, गगनबावडा – 99.07 टक्के, शाहूवाडी – 98.91 टक्के, पन्हाळा – 98.91 टक्के, शिरोळ – 97.95 टक्के, हातकणंगले – 96.76 टक्के, करवीर – 86.22 टक्के

आजरा-भुदरगड (गारगोटी) उपविभागातील भुदरगड तालुक्यातील फक्त 166 सात बारा संगणकीकरणाची कार्यवाही प्रलंबित असून तीही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी व्यक्त केला.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here