परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी जिल्हातील गंगाखेड येथून हैद्राबाद कडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा राशनचा 600 पोते गहू पोलीस पथकाने धाडसी कारवाई करत केरवाडी गावाजवळ पकडला आहे. याप्रकरणी पालम पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड येथील एका ट्रेडींग कंपनी येथून 619 पोते स्वस्त धान्य दुकानदाराकडून अवैध रित्या विकत घेतलेला गहू ज्याची किंमत 7 लाख 76 हजार 902 रुपये आहे.
ही राशनसाठीची गव्हाची पोते ट्रक क्रमांक एम .एस .26 एडी 6488 मध्ये भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी 1 सप्टेबर रोजी पाठविला जात होता.याच दरम्यान राष्ट्रीय मार्गावर केरवाडी गावाजवळ ट्रक आला असताना महामार्ग पोलीस पथकाने ट्रक चालकास ट्रक थांबविण्यासाठी सांगितले असता ट्रक चालकाने ट्रक न थांबवता भरधाव वेगाने पुढे पळविला.
यानंतर पोलीस पथकाला संशय आल्याने हा ट्रक पाठलाग करून पकडून मालाची तपासणी केली असता त्यात अवैध रित्या 619 पोते रेशनचा गहू असल्याचे उघड झाले आहे. हा ट्रक पोलीस ठाण्यात आणून चालक मोहम्मद गौस मोहम्मद याकूब रा.नांदेड व सहाय्यक आयुब खान सुभान खान या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.