हॅलो महाराष्ट्र ऑनालाइन | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दी लगत असणारी माण, हिंजवडी, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही सात गावे महापालिकेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात येणार आहेत. विकासापासून वंचित असलेल्या या सात गावांचा लवकरच महापालिका क्षेत्रात समावेश यावा अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. यामुळेच ही गावे लवकर महापालिकेत समाविष्ट होतील असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीलगत हिंजवडी, मारुंजी, नेरे, जांभे, सागंवडे, गहुंजे ही गावे येतात. या गावांची लोकसंख्या देखील जास्त आहे. असे असताना देखील ही गावे अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे या गावांचा महापालिकेत समावेश करून घेणे जास्त आवश्यक आहे. यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी सरकारकडे मागणी केली होती. मुख्य म्हणजे या सात गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा ठराव 2015 मध्ये मंजूर करण्यात आला होता. मात्र या ठरावावरील पुढील प्रक्रिया काही कारणांमुळे रखडली गेली होती.
मात्र पुन्हा एकदा या सात गावांचा महापालिकेत समावेश करण्यात यावा ही मागणी श्रीरंग बारणे यांनी उचलून धरली आहे. मुख्य म्हणजे या मागणीला विचारात घेऊन एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला आहेत. दरम्यान, “गावांचा विकास, नागरिकांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात आणि अनाधिकृत बांधकाम रोखण्याच्या दृष्टिकोणातून या सात गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेतला जाईल” असा विश्वास श्रीरंग बारणे व्यक्त केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीलगत असणाऱ्या या सात गावांची दुर्दशा दिवसेंदिवस बिघडत होत चालली आहे. वाढते नागरीकरण, सुविधांचा अभाव, वाहतुकीची समस्या, सांडपाण्यामुळे वाढत चाललेले प्रदूषण, अशा अनेक गोष्टींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जर या गावांना महापालिकेत समाविष्ट करण्यात आले तर या गावच्या विकासावर जास्त भर देण्यात येईल. तसेच नागरिकांच्या सोयी सुविधांवर देखील विचार केला जाईल.