मेंदूज्वर आजाराने भंडाऱ्यात पहिला बळी, 7 वर्षीय मुलीला गमवावा लागला जीव

meningococcal meningitis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात मेंदूज्वर (meningococcal meningitis) आजारामुळे एका 7 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. हि घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील लाखोरी या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे (meningococcal meningitis) आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नुवांशी विलास उरकुडे असे या मृत चिमुकलीचे नाव आहे.

नुवांशी हि जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत होती. 4 ते 5 दिवसापासून मृत नुवांशीला ताप आला होता. तिच्यावर गावीच आरोग्य उपकेंद्रात उपचार सुरु होते (meningococcal meningitis) मात्र ताप काही कमी होईना म्हणून तिला ग्रामीण रुग्णालय लाखनी या ठिकाणी हलवण्यात आले. मात्र तिची प्रकृती खालावत असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा या ठिकाणी हलवण्यात आले.

यानंतर नुवांशी हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला डॉक्टरांनी तपासून नागपूर या ठिकाणी हलविण्यास सांगितले. त्यानुसार तिला नागपूरमधील धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, अखेर उपचारादरम्यान (meningococcal meningitis) 7 वर्षीय मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!