बकासूर गॅंगमधील 7 युवक तडीपार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातार्‍यातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बकासुर गँगमधील सातजणांना तडीपार करण्यात आले आहे. सर्व तडीपार संशयित युवक हे सातारा शहरातील असून पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे पाठवला. त्या प्रस्तावावर कारवाई करण्यात आली आहे. संशयित सात जणांचा बकासूर नावाचा ग्रुप असून टोळी प्रमुखावरही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित टोळीप्रमुख यश नरेश जांभळे (वय 21, रा. झेडपी कॉलनी, शाहूपुरी), आदित्य जयेंद्र गोसावी (वय 21, शुक्रवार पेठ), विशाल राजेंद्र सावंत (वय 20, रा. बुधवार पेठ), साहील जमीर जमादार (वय 21, रा. बुधवार पेठ), ऋतिक ऊर्फ विजय विनोद कांबळे (वय 23, रा. बुधवार नाका), प्रज्वल प्रवीण गायकवाड (वय 24, अंजली कॉलनी, शाहूपुरी), शिवम संतोष पुरीगोसावी (वय 18, रा. गडकरआळी सर्व सातारा) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

आरोपींवर शाहूपुरी, सातारा शहर व सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत खूनाचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत, मारहाण करणे, अवैध शस्त्राांचा धाक दाखवून धमकावणे, मटका जुगार चालवणे असे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. दरम्यान, याच टोळीतील काही जणांवर चार दिवसांपूर्वी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कॉलेज समोर अल्पवयीन मुलाला मारहाण करत त्याच्याकडील पैसे, घड्याळ चोरुन दरोडा टाकला आहे. संशयितांना दरोड्याच्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्यांना आता 1 वर्षासाठी तडीपार केले आहे.

Leave a Comment