हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती (Shetkari Karjmukti) साठी शिंदे- फडणवीस (Shinde Government) सरकारने 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सरकारने 700 कोटी मंजूर केले आहेत. जे शेतकरी (Farmers) नियमित कर्ज फेडतात त्यांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे नववर्षावर शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.
खरं तर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोना महामारीमुळे त्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आली नाही. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यांनतर या योजनेसाठी 16 सप्टेंबर 2022 रोजी 2 हजार 350 कोटी वितरित केले होते. त्यांनतर 18 ऑक्टोबरला 650 कोटी आणि आता 700 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 4 हजार 700 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. मात्र राज्यातील तब्बल 14 लाख शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती चा फायदा होणार आहे.
शेतकरी मित्रानो, तुम्हालाही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सेवा केंद्रात जाऊन पैसे खर्च करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. हॅलो कृषी हे अँप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि सरकारी योजनांचा फायदा घ्या. याव्यतिरिक्त Hello Krushi वर तुम्हाला बाजारभाव, हवामान अंदाज, सातबारा उतारा, जमीन मोजणी याबाबतची संपूर्ण माहिती अगदी मोफत मध्ये मिळते. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करून मोबाईल मध्ये Install करा. आणि वेगवेगळ्या कृषी योजनांचा आणि सरकारी अनुदानाचा लाभ घ्या.
Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here
कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार कर्जमुक्तीचा फायदा ?
जे शेतकरी नियमित कर्जफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
याकरता 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या कालावधीत सदर शेतकऱ्याने नियमित कर्जफेड केली असावी.
या तीन आर्थिक वर्षांपकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
तसेच 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.