हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्यामध्ये भव्य राम मंदिराची पायाभरणी करण्यात येणार आहे. या सुवर्ण क्षणाकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागले आहे. यामध्ये झारखंडमधील सरस्वती देवी यांचा ही समावेश आहे. सरस्वती देवी या 72 वर्षीय असून त्या गेल्या 30 वर्षांहून अधिक काळापासून राम मंदिराच्या उभारणीसाठी मौन उपोषण करत आहेत. इतकेच नव्हे तर, राम मंदिराची उभारणी झाल्यानंतरच मी मौन व्रत सोडेल असा निर्धार त्यांनी केला आहे.
सरस्वती देवी यांचे कुटुंब गेल्या 30 वर्षाहून अधिक काळापासून त्यांचा आवाज ऐकण्यासाठी तरसत आहेत. परंतु राम मंदिर उभारल्यानंतर आणि रामाचे दर्शन घेतल्यानंतरच मी मौन सोडेल अशी शपथ सरस्वती देवी यांनी घेतली आहे. अखेर 22 जानेवारी रोजी तो क्षण सरस्वती देवी यांच्या आयुष्यात येणार आहे. येत्या 22 जानेवारी रोजी सरस्वती देवी या रामलल्लाचे दर्शन घेऊन आपले मौन व्रत सोडणार आहेत.
त्यामुळे सरस्वती देवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे लक्ष राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याकडे लागले आहे.
सध्या सरस्वती देवी या आपल्या कुटुंबासोबत हातवारे करून बोलत असतात. त्यांची माहिती देत कुटुंबातील व्यक्ती सांगतात की, सरस्वती देविया सतत राम जन्मभूमीचे अध्यक्ष नित्य गोपालदास यांना भेटण्यासाठी जात असे. ती राम मंदिराच्या उद्घाटन क्षणांची आतुरतेने वाट पाहत आहे. ज्यावेळी तिच्या कानावर राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची बातमी पडली, त्यावेळी तिला सर्वाधिक आनंद झाला. आता या सोहळ्यासाठी सरस्वती देवी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याचा त्यांचा सर्वाधिक आनंद आहे.