हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माणसाची एकदा देवावर श्रद्धा बसली कि तो व्यक्ती आपल्या श्रद्धेपोटी काही करायला तयार होतो. अशाच एका माणसाची हि गोष्ट. भगवान शंकरावर असणाऱ्या अढळ श्रद्धेपोटी महाराष्ट्रातील सांगलीतील जे. के. चौहान (J. K. Chauhan) हे वयाच्या 74व्या वर्षी अमरनाथ यात्रेला निघाले. ते पण मोटारसायकलवर. श्रद्धेला आणि उत्साहाला वय लागत नाही हे चौहान यांना बघून कळतं. माणूस नुसता थोडासा रोजच्या किलोमीटरपेक्षा जास्त गाडी चालवायला लागला की रडतो पण जे.के चौहान (J. K. Chauhan) यांना बघून नेमकं या व्यक्तीच्या उत्साहाचं रहस्य काय असा प्रश्न पडतो. बरं म्हणजे श्रद्धा एका बाजूला आणि त्या श्रद्धेपोटी इतक्या लांब मोटारसायकल चालवत जाणं एका बाजूला… त्यांचा हा उत्साह तरुणांना पण लाजवेल असा आहे.
चौहान रात्रीचा वेळ मंदिरांमध्येच घालवतात
पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि डोक्यावर अण्णा हजारे टोपी, पांढरी शुभ्र पँट परिधान केलेले चौहान (J. K. Chauhan) मोटारसायकलवरून सांगलीहून जम्मूला जातात. ते दररोज 500 किमी अंतर पार मोटारसायकलने पार करतात. या प्रवासात चौहान (J. K. Chauhan) रात्रीचा वेळ मंदिरांमध्येच घालवतात. जिथे कुठे वाटेत मंदिर दिसेल तिथे ते मुक्कामी थांबत. जेवायची व्यवस्था त्यांची लंगरमुळेच होत असे. वाटेत लंगर दिसलं की ते थांबून जेवण करतात. ज्या ठिकाणी त्यांना लंगर भेटत नाही त्या ठिकाणी ते हॉटलमध्ये जेवण करतात.
महाराष्ट्राच्या सांगलीतला हा शेतकरी याआधी 12 वर्षे सायकलवरून, सहा वर्षे पायी अमरनाथला चालत गेला आहे. 2014 पासून ते दुचाकीवरून यात्रेसाठी जात आहेत. चौहान (J. K. Chauhan) म्हणतात, कोविड महामारीच्या मागील दोन वर्षांच्या काळात तीर्थयात्राही केली.
हे पण वाचा :
पोस्ट ऑफिसद्वारे Passport साठी कसा अर्ज करावा ते समजून घ्या
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये फक्त 20 रुपये भरून मिळवा अतिरिक्त 56 दिवसांची व्हॅलिडिटी !!!
Business Idea : कमी गुंतवणुकीद्वारे ‘या’ व्यवसायातून मिळवा हजारो रुपये !!!
घरबसल्या अशा प्रकारे मिळवा आपले हरवलेले Voter ID !!!
जबरदस्त लूक अन् वेगाने चार्जिंग होणाऱ्या जगातील टॉप 5 Electric Cars !!!