कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर तांबवे येथील कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्ट (फुटबॉल टिम) तर्फे रुबी हाॅल, पुणे यांचे सहकार्याने स्व. अण्णा बाळा पाटील महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबीराचा शुभारंभ सरपंच शोभाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिरामध्ये एकूण 77 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिरास रोटरी क्लब मलकापूरचे अध्यक्ष सलिम मुजावर, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, निवासराव पाटील, सह्याद्रीचे संचालक रामचंद्र पाटील, माजी सरपंच जावेद मुल्ला, ग्रा. प. सदस्य धनंजय ताटे, रुबी हाॅलचे सिनियर मॅनेजर संजय लावंड, लक्ष्मी क्लिनिकचे डाॅ. विकास पाटील, विलास पाटील, कोयनाकाठचे अध्यक्ष राजदिप पवार, उपाध्यक्ष संकेत पाटील, सचिव युवराज पाटील, यांची प्रमुख उपस्थित होते.
यावेळी राहुल कुलकर्णी व सौ. श्वेता कुलकर्णी या पती-पत्नींनी रक्तदान केल्याबद्दल तर देहदान करणारे संभाजी पाटील यांचाही गौरव करण्यात आला. प्रास्ताविक दादासो शिंदे यांनी केले. आभार अतुल पाटील यांनी मानले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा