कळंबोली जंक्शनच्या विकासासाठी 770.49 कोटी मंजूर ; गडकरींची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राज्यभरामध्ये अनेक महत्त्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या शहरांना छोट्या शहरांशी जोडणं आणि औद्योगिक आणि आर्थिक प्रगती करणे हा सरकारचा महत्त्वाचा उद्देश आहे. रस्ते प्रकल्पांच्या संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट आता हाती आली असून मुंबई जवळच्या कळंबोली जंक्शनच्या विकासासाठी 770.49 कोटी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

याबाबतची माहिती देताना नितीन गडकरी यांनी ट्विट करीत सांगितले आहे की 15.53 किलोमीटरचा हा एक महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प आहे. पंचभुजा असलेला हा सिग्नल युक्त रोटरी जंक्शन प्रकल्प मुंबई पुणे एक्सप्रेसवे, राष्ट्रीय महामार्ग 48, राष्ट्रीय महामार्ग 548 आणि सायन पनवेल महामार्गाच्या छेदनबिंदूवर स्थित आहे. कळंबोली जंक्शन या प्रमुख महामार्गावरून आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची जोडला जाईल असेही त्यांनी सांगितला सोशल मीडियावर या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे.