सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून माण- खटाव मधील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सिमेंट कॉंक्रीट बंधारे निर्मितीसाठी काही दिवसापूर्वी जलसंधारण मंत्रालयाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर विश्वास ठेऊन पहिल्याच प्रयत्नात 79 सिमेंट बांधाऱ्याला मंजुरी दिल्याची माहिती आज प्रभाकर देशमुख यांनी दहिवडी येथील पत्रकार परिषदेत दिली.
प्रभाकर देशमुख म्हणाले, माण खटाव मधील जनतेला दुष्काळमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार घेऊन गावोगावी जनजागृती करत चांगल्या प्रकारे पाणी फाऊंडेशनचे काम माण खटाव मध्ये करण्यात आले. जलसंधारण सचिव असताना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत माणगंगा नदीसाठी 11 कोटी बाणगंगा नदीसाठी 14 कोटी, वसना नदीसाठी 7 कोटी, येरळा नदीसाठी 9 कोटी असा भरगच्च निधी उपलब्ध करून दिला. त्या माध्यमातून सिमेंट साखळी बंधारे मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिल्यामुळे आज नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विहिरी देखील उन्हाळ्यात पाण्याने भरलेले असल्यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये उसाचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना घेता आले.
माण खटाव मधील खालील गावामध्ये होणार सिमेंट कॉंक्रीट बंधारे.
माण तालुका – बिदाल 2, बिजवडी 2, दानवलेवाडी 2, धामणी 2, जाधव वाडी 2, पिंगळी खुर्द 1, रांजणी 1, सोकासन 2, टाकेवाडी 1, घोडेवाडी 1, शिंदी खुर्द 4, धुळदेव 2, ढाकणी 2, दहिवडी 2, पांगरी 2, मलवडी 4, बिदाल 2, डंगिरेवाडी 1, पळशी 3, इंजबाव 2, मार्डी 5, ढाकणी 1, वडजल 3, नरवणे 5, खटाव तालुका – सूर्याचीवाडी 3, बनपुरी 3, पिंपरी 4, मरडवाक 3, मोराळे 1, औंध 3, वाकेश्वर 2, तरसवाडी 1, मोराळे 3 गेटेड सिमेंट कॉंक्रीट बंधारे, वाकेश्वर 2 को. प. बंधारे,