7th Pay Commission | आपले केंद्र सरकार हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन निर्णय घेत असतात. त्याचप्रमाणे अनेक योजना राबवत असतात. जेणेकरून कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये खूप फायदा होतो. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता सगळे सरकारी कर्मचारी खुश झालेले आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवण्याबाबत केंद्र सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून 46% दराने महागाई भत्ता (7th Pay Commission) दिला जात होता. परंतु आता मोदी सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार हा महागाई भत्ता 4 टक्क्याने वाढविण्यात आलेला आहे. म्हणजेच आता केंद्र कर्मचाऱ्यांना 50 टक्के एवढा महागाई भत्ता दिला जाणार आहे. हा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे. याचा लाभ मात्र मार्च महिन्याच्या वेतना सोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात मिळणार आहे. म्हणजेच एप्रिल महिन्याच्या पगारासोबत त्यांना वेतन वाढ मिळणार आहे.
यामुळे या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यातील महागाई भत्ता आणि त्यांच्या फरकाची रक्कम देखील मिळणार आहे. त्याशिवाय घर भाडे भत्ता देखील मिळणार आहे. हा घर भाडे भत्ता हा केंद्र कर्मचारी राहत असलेल्या शहरानुसार वाढून किंवा कमी करून दिला जाणार आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार घर भाडे भत्त्यात एक टक्क्यांपेक्षा पासून ते तीन टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. तर आता आपण कोणत्या शहरात राहणारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे याची माहिती पाहणार आहोत.
HRA किती वाढला ? | 7th Pay Commission
परंतु आता घेतलेल्या नवीन निर्णयानुसार X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 30 टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे. Y श्रेणीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 20% घरभाडे भत्ता मिळणार आहे. त्याचप्रमाणे Z श्रेणीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10 टक्के घरभाडे भत्ता दिला जाणार आहे. म्हणजेच सरकारने 1टक्क्यापासून ते 3 टक्केपर्यंत ही घर भाडे भत्याची वाढ केलेली आहे. आता X, Y आणि Z श्रेणीमध्ये कोणती शहर येतात हे आपण जाणून घेऊया.
X श्रेणीमध्ये येणाऱ्या शहरांची नावे
X श्रेणीमध्ये दिल्ली, अहमदाबाद, बँगलोर, मुंबई, पुणे, चेन्नई आणि कोलकत्ता ही शहरे येतात.
Y श्रेणीमध्ये येणाऱ्या शहरांची नावे
पाटणा, लखनौ, विशाखापट्टणम, गुंटूर, विजयवाडा, गुवाहाटी, चंदीगड, रायपूर, राजकोट, जामनगर, वडोदरा, सुरत, फरीदाबाद, गाझियाबाद, गुडगाव, नोएडा, रांची, जम्मू, श्रीनगर, ग्वाल्हेर, इंदूर, भोपाळ, जबलपूर, उज्जैन, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, सांगली, सोलापूर, नाशिक, नांदेड, भिवडी, अमरावती, कटक, भुवनेश्वर, राउरकेला, अमृतसर, जालंधर, लुधियाना, बिकानेर, जयपूर, जोधपूर, कोटा, अजमेर, मुरादाबाद, मेरैली , अलीगढ, आग्रा, लखनौ, कानपूर, अलाहाबाद, गोरखपूर, फिरोजाबाद, झाशी, वाराणसी आणि सहारनपूर Y श्रेणीत येतात
Z श्रेणीमध्ये येणाऱ्या शहरांची नावे
X आणि Y श्रेणीमध्ये ज्या शहरांची नावे येत नाही त्या शहरांची नावे Z श्रेणीमध्ये येतात.