कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी असतानाही पहाटे रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्या ८२ जणांवर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. यावेळी पकडलेल्या सर्वांना पोलिसांनी कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले.
सध्या देशभर संचारबंदी सुरू आहे. कोरोना प्रार्दुभाव वाढल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र तरीही काही लोक प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत. कराड, मलकापूर, सैदापूर परिसरात अनेक लोक मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत. सोमवारी पहाटे पोलीस उपअधिक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे यांनी वेगवेगळी पथके तयार करत पहाटे मॉर्निंग वॉक करणारांची धरपकड सुरू केली.
त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात येत होते. दीड तासात तब्बल 82 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना पोलीस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत चालवत नेण्यात आले. या कारवाईने खळबळ उडाली होती. यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग
कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क
शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार