‘83’ सिनेमातील दीपिकाच्या लूकवर चाहते फिदा; पण का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुप्रतीक्षित ‘83’ चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. दिपवीरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे रियल लाइफ मधील या वैवाहिक जोडीन ‘83’ चित्रपटात रील लाईफमध्ये सुद्धा एका वैवाहिक जोडप्याची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटात एकीकडं रणवीर सिंह कपिल देवची भूमिका साकारत आहे, तर दुसरीकडं दीपिका पादुकोण त्याची पत्नी रोमी देवच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी दीपिकाने चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत दीपिका आणि रणवीर एकत्र दिसत आहेत. चित्रपटाच्या फर्स्ट लूकला सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, यामागचं कारण म्हणजे हे दोघेही कपिल देव आणि रोमी देव सारखे दिसत आहेत.

दीपिका पादुकोणने ’83’चा फर्स्ट लूक करताना शेअर लिहिले की, “क्रीडा इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण हस्तगत करणार्‍या चित्रपटात लहान भूमिका निभावणे ही देखील एक सन्मानाची बाब आहे. नवऱ्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आकांक्षाच्या यशामध्ये त्याच्या पत्नीची काय असते हे मी माझ्या आईच्या रूपात जवळून पाहिले आहे. ’83’ चित्रपट अशा अनेक महिलांचा सन्मान करत आहे ज्यांनी आपल्या स्वप्नांच्या आधी आपल्या नवऱ्याच्या स्वप्नांना पहिले.” दीपिकाची ही पोस्ट सध्या व्हायरल झाली असून तिच्या लुकवर चाहते फिदा झालेले आहेत.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.