सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा MIDC मधील वेदांत इलेक्ट्रीकल कार्पोरेशन, विपूल इंटरप्रायजेस मधून चोरीला गेलेल्या ८८८ किलो वजनाच्या ५,७७,२०० /- रुपये किंमतीच्या तांब्याच्या धातूच्या विटा आणि ११ बॅटरी असा जवळपास ६,०७,२०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसानी ६ महिलांना ताब्यात घेतलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा एम. आय. डी. सी. येथील वेदांत इलेक्ट्रीकल कार्पोरेशन, विपूल इंटरप्रायजेस येथे घडलेला तांबा तार चोरीचा गुन्हा महिला आरोपींनी मिळून केला आहे अशी बातमी पोलीस निरीक्षक अरुण देवकर याना मिळाली. त्यानंतर त्यांनी याबाबत पोउनि अमित पाटील व पथकास सांगून पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे अमित पाटील यांनी पथकातील महिला/पुरुष अंमलदार यांच्या मदतीने ६ महिला आरोपींना गुन्हयाच्या तपासासाठी ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनीच सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न केले.
त्यानंतर आरोपींची सदर चोरीतील तांब्याच्या तारा ज्या दुकानदारास विकल्या होत्या त्याच्याकडून ८८८ किलो वजनाच्या ५,७७,२०० /- रुपये किंमतीच्या तांब्याच्या धातूच्या विटा हस्तगत करून सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं ४०७ / २०२३ भादंवि कलम ३८०, ४११.३४ हा गुन्हा उघड केला. तसेच सदर महिला आरोपी यांनी सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं ३२९ / २०२३ भादंवि कलम ४६९ हा गुन्हा केला असल्याचे निष्पत्र करुन त्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या ३०,०००/- रुपये किंमतीच्या एकुण ११ बॅटरी हस्तगत करत एकुण २ चोरीचे गुन्हे उघड करुन एकुण ६,०७,२०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सपोनि संतोष पवार, रविंद्र भोरे, विश्वास शिंगाडे, पोउनि अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, गणेश कापरे, मोहन पवार, प्रविण कांबळे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, शिवाजी गुरव, महिला पोलीस अंमलदार दिपाली यादव, मोना निकम, शकुंतला सणस, अनुराधा सणस, तृप्ती मोहिते, दिपाली नामदे यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.