‘नन्हे फरीस्ते’ मोहिमेअंतर्गत 895 मुलांची सुटका; RPF पोलिसांची मोठी कामगिरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वे प्रवासादरम्यान सणासुदीला मोठी  गर्दी रेल्वेमध्ये पहायला मिळते. भारतीय रेल्वेने (Indian Railways) कोट्यावधी लोक रोज प्रवास करतात.या गर्दीमुळे अनेकांची लहान मूल हरवतात. गर्दीचा फायदा घेऊन अनेक लहान मुलांचे अपहरण देखील केले जाते. अश्या घटना देशभरात घडताना दिसून येतात. मात्र ह्या घटना कमी करण्यासाठी रेल्वे पोलीस  सज्ज असतात. तसेच हरवलेली व अपहरण झालेली मूल शोधून परत त्याच्या पाल्यांना मिळवून देण्यासाठी रेल्वे पोलिसांनी ” ऑपरेशन नन्हे फरिस्ते ” सुरु केले होते. या मोहिमेच्या माध्यमातून 895 मुलांची सुटका करण्यात आली आहे.

RPF ने केली 895 मुलांची सुटका :

“ऑपरेशन नन्हे फरिस्ते ” अंतर्गत  रेल्वे पोलिसांनी चालवलेल्या  मोहिमेतून रेल्वे पोलिसांनी सप्टेंबर 2023 मध्ये 573 मुले आणि 322 मुलींसह 895 मुलांची सुटका केली आहे. मोहिमेत शोधलेल्या मुलांना रेल्वे पोलिसांनी त्यांच्या परिवाराला मिळवून देण्याचे सर्वोत्तम काम केले आहे. रेल्वे संरक्षण दलाने केलेल्या कामगिरीतून अनेकांना आपले  घर आणि परिवार परत मिळाला आहे. RPF च्या मानवी तस्करी विरोधी युनिट्ने मानवी तस्करी रोखण्यात गुंतलेल्या एजन्सी आणि स्वयंसेवी संस्थांच्या नियमित संपर्कात राहून त्यांना तस्करी होत असलेल्या मुलांपासून वाचवण्यात मदत केली आहे.  सप्टेंबर महिन्यात तस्करांच्या तावडीतून 29 जणांची सुटका करण्यात आली असून, 14 तस्करांना अटक करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात 28000 तक्रारीचे  निवारण  :

रेल्वे विभागात सप्टेंबर महिन्यात आलेल्या 28000 तक्रारी  सोडवण्यासाठी  RPF ने मोठे  प्रयत्न केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चालत्या रेल्वेत चढन्याच्या प्रयत्नात असलेले अनेक प्रवासी अपघातग्रस्त होताना RPF ने वाचवले आहे. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात ऑपरेशन जीवन  रक्षा  अंतर्गत  265 लोकांचे  प्राण वाचवण्यात  RPF ला यश आले आहे. तसेच  महिला सुरक्षेची खात्री करण्यासाठी  मेरी सहेली युनिट ने मोठी  मदत  केली आहे. रेल्वेने विभागाने  महिलांसाठी राखीव डब्यात शिरलेल्या प्रवाश्यांवर कारवाई केली आहे. त्या अंतर्गत  6033 लोकांवर  कारवाई केली गेली आहे. तसेच रेल्वे पोलिसांच्या ऑपरेशन “NARCOS” अंतर्गत सप्टेंबर 2023 मध्ये, 2.65 कोटी रुपयांच्या NDPS जप्तीसह 70 लोकांना अटक करण्यात आली आणि अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सदर एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आले.