8th Pay Commission| केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर आज केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत उत्सुकता होती. सरकारकडून करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर आता पुढील वेतन आयोग कधी लागू होईल? हा प्रश्न सतत चर्चेत होता. अखेर आज सरकारने हा निर्णय जाहीर करत कर्मचाऱ्यांच्या आनंदात आणखीन भर घातली आहे. (8th Pay Commission)
दरम्यान, यापूर्वी २०१४ मध्ये सातव्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली होती. आणि २०१६ मध्ये तो लागू करण्यात आला होता. सातव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ झाली होती. आता एकूण दहा वर्ष संपूर्ण झाल्यानंतर आठवा वेतन आयोग कधी लागू करण्यात येईल? हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. त्यामुळे सरकारने आठवा वेतन लागू करण्याबाबत हिरवा कंदील दाखवला आहे.
परंतु आता आठवा वेतन आयोग लागू (8th Pay Commission) झाल्यास कोणत्या कर्मचाऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे, हे स्पष्ट होणे बाकी आहे. सरकार लवकरच याबाबतच्या सर्व बाबी जाहीर करणार आहे. सध्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.