वाळूज | वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीचे शटर उचकटून 9 लाखाचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला टोळीतील एका चोरट्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. आकाश प्रल्हाद भालेराव वय 21 (रा.आंबेडकर नगर ,जोगेश्वरी तालुका गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे .त्याच्याकडून पोलिसांनी 6 लाख 30 हजाराच्या चोरीचा माल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले कोमलकुमार लुनावत (रा.समर्थ नगर औरंगाबाद ) यांची एल -55 सेक्टरमध्ये लूनावत अॉटोमेशन कंट्रोल सिस्टीम नावाची कंपनी आहे. 4 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या मागील शटर उचकटून दोन शोल्डरिंग गन, एक शोल्डरिंग स्टेशन, दोन मोटल रोल, टुल किट सेट, हँड ग्रँडर, तीन इंडक्शन तसेच सर्वो मोटर, एल सी आर मीटर, केबल पॉली कॅप वायर असे जवळपास 9 लाखांचे साहित्य चोरून नेले आहे. याप्रकरणी लूनावत यांनी सहा जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
चोरी करताना चोरटे कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. चोरीचा तपास सुरू असताना खबऱ्याकडून मिळणाऱ्या माहितीवरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहा जुलै रोजी जोगेश्वरी येथील आकाश भालेराव यास ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले त्याच विषयात विश्वासात घेतल्यानंतर त्याने इतर तीन साथीदारांच्या मदतीने कंपनीत चोरी केली होती अशी कबुली दिली.