मंदिरातून दर्शन घेवून घरी परतताना चार तरूणांचा भीषण अपघातात मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाशिम | शेगाव येथून संत गजानन महाराजांचे दर्शन घेवून वाशिमला परत निघालेल्या चार तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग 6 वर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील पांगरीकुटे येथील रहिवासी असलेले हे चार तरुण शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात जाऊन रात्री घरी परतत होते. पण भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कार चालक शुभम कुटे (वय- 23), धनंजय नवगरे (वय- 21), विशाल नवगरे (वय- 22), मंगेश नामदेव राऊत (वय -28) (सर्व रा. पांगरकुटे) यांचा समावेश आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, खामगावकडे जाणाऱ्या रोडवर त्यांची कार क्रमांक (एम.एच. 37 बी बी- 8262) आणि आयशर ट्रक क्रमांक (एम.एच.19 सी वाय- 6404) मध्ये जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी तरुणाला उपचारासाठी खासगी वाहनातून सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. जखमी तरूणाला उपचारासाठी अकोला येथे आणत असताना त्याचा मृत्यू झाला.

गुरूवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बाळापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह वाहतूक सुरळीत केली. तसेच घटस्थळांचा पंचनामा केला. सदरचा अपघात रिधोरा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ झाला आहे.

Leave a Comment