भयानक : अल्पवयीन, मतिमंद मुलीवर बलात्कार प्रकरणी 9 जणांना पोलीस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण | पाटण येथील अल्पवयीन व मतीमंद मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी 9 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली आहे. पुण्यातील सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असता 8 जणांना 10 दिवसाची तर महिलेस 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण येथील एका महीलेने दि. 27/01/2022 रोजी ते 18/2/2022 या दरम्यान तिच्या परीचयाच्या एका अल्पवयीन व मतीमंद मुलीचा गैरफायदा घेवून तिला बाहेर फिरायला नेण्याचे बाहेर खाऊ खायला देण्याचे व पैसे देण्याचे आमीष दाखवुन तिला बाहेर घेवून गेली. मुलीला पाटण व आजुबाजुचे परीसरातील लोकांशी ओळख करून देवुन त्यांचेशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. सदर पाटण व आजुबाजुचे परीसरातील 8 लोकांनी सदर अल्पवयीन व मतीमंद पिडीत मुलीवर वेळोवेळी व वेगवेळ्या ठिकाणी नेवुन वारंवार बलात्कार केला आहे.

याबाबत यातील पिडीत अल्पवयीन मतीमंद मुलीचे आईने दिले तक्रारीवरून पाटण पोलीस सदर गुन्हयातील सर्व 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक पाटण पोलीस ठाणे यांनी केला असून. पोलीस अधिक्षक सातारा यांचे आदेशाने सदर गुन्हयाचा पुढील तपास महीला पोलीस अधिकारी करीत आहेत. त्यांना आज कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात रिमांड कामी हजर करण्यात येणार आले होते. न्यायालयाने 8 आरोपींना 10 दिवस तर महिलेस 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.