खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून “या” तीन तालुक्यासाठी 91 लक्ष 38 हजाराचा निधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून खंडाळा, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 91 लाख 38 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून हा निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्याने स्थानिक विकासकामांना गती येणार आहे.

खंडाळा तालुक्यातील लोहोम ते घाडगेवाडी रस्ता ग्रामा 96 साक्रं 0/00 ते 3/00 सुधारणा करणे 20 लक्ष रुपये, प्र.रा.मा.15 ते शेळकेवस्ती चव्हाणवस्ती (लोणंद) पिंपरे ते जिल्हा हद्द रस्ता ग्रामा 68 साक्रं 3/500 ते 7/00 सुधारणा करणे 17 लक्ष,
असवली येथे स्‍मशानभूमि सुधारणा करणे 4 लक्ष, वाई तालुक्यातील अमृतवाडी अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे 4 लक्ष, भुईंज-बदेवाडी येथील अंतर्गत रस्‍ता करणे 5 लक्ष, यशवंतनगर येथील अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लक्ष मंजूर झाला आहे.

आसरे येथे शाळा खोल्या बांधणे 8. 96 लक्ष, पसरणी येथे शाळा खोल्या बांधणे 8.96 लक्ष, पांढरेचीवाडी येथे शाळा खोल्या बांधणे 8. 96 लक्ष, मेटतळे स्‍मशानभूमि येथे हायमास्‍ट लॅम्प बसविणे 1लाख 50 हजार, महाबळेश्‍वर तालुक्यातील कुमठे येथे स्‍मशानभूमीत हायमास्‍ट लॅम्प बसविणे 1 लाख 50 हजार, बिरमणी येथे स्‍मशानभूमित हायमास्‍ट लॅम्प बसविणे 1 लाख 50 हजार रुपये असा निधी मंजूर झाला आहे.