हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी तिसगाव आश्रम शाळेतील 96 विद्यार्थ्यांना दूध पिल्यामुळे विषबाधा (food poisoning) झाली आहे. आता या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांगितले जात आहे की, खुलताबादमधील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली आहे. यामुळेच सध्या अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, खुलताबाद तालुक्यातील तिसगावमध्ये असलेल्या आश्रम शाळेत अनेक विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजन आणि शिक्षणाची व्यवस्था शासनाकडून करण्यात येते. आज आश्रम शाळेमध्ये सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांना देण्यासाठी शाळा प्रशासनाकडून दूध आले होते. हे दूध सर्व विद्यार्थ्यांना नाष्टा करत्यावेळी देण्यात आले. परंतु दूध पितात विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. तसेच काही विद्यार्थ्यांची प्रकृती देखील बिघडली.
विद्यार्थ्यांना होत असलेला त्रास पाहून तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. एक एक करून असे 96 विद्यार्थी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर डॉक्टरांनी या सर्व विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे सांगितले. सध्या विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. मात्र या गंभीर प्रकरणानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच या विद्यार्थ्यांना विषबाधा कशी झाली याचा तपास लावला जात आहे.
दरम्यान, या सर्व घटनेवर वेगवेगळ्या संघटनांनी आणि विरोधी पक्षांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या सर्व घटनेला प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याची टीका केली जात आहे. मुख्य म्हणजे, या विषबाधा प्रकरणात जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेश युवा संघटनमंत्री सतीश देवेंद्र लोखंडे यांनी केली आहे.