सातारा जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 980 जण कोरोनामुक्त

Satara corona patient
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज बुधवारी संध्याकाळपर्यंत 980 जणांना घरी सोडण्यात आले गेल्या 24 तासात 972 जण पाॅझिटीव्ह आले असून 26 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात

जावली 40 (8174), कराड 154 (25035), खंडाळा 67 (11341), खटाव 139 (18480), कोरेगांव 98 (15886), माण 53 (12498), महाबळेश्वर 15 (4197), पाटण 42 (7813), फलटण 80 (27664), सातारा 224 (38411), वाई 46 (12219) व इतर 14 (1210) असे आज अखेर एकूण 182928 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात

जावली 0 (185), कराड 7 (737), खंडाळा 0 (146), खटाव 2 (457), कोरेगांव 3 (365), माण 2(247), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (176), फलटण 1 (274), सातारा 7 (1167), वाई 2(322) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4120 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.