Friday, December 5, 2025
Home Blog Page 3

Election Result Postponed : मोठी बातमी!! नगरपरिषद, नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार

Election Result Postponed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Election Result Postponed । महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. खरं तर आज अनेक नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि या निवडणुकीचा निकाल हा उद्या जाहीर करण्यात येणार होता. मात्र आता २१ डिसेंबरला नगरपरिषद, नगरपंचायतीचा निकाल जाहीर होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत आदेश दिला आहे. त्यामुळे गुलालाची उधळण हि २१ डिसेंबरला पाहायला मिळेल.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार, राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्यात येईल. २० डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती आणि २१ डिसेंबरला निकाल जाहीर होणार होता. त्यामुळे आज ज्याठिकाणी निवडणुका आहेत, आणि मतदान सुरु आहे त्याचा निकाल सुद्धा म्हणजेच दोन्ही निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करावे असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे उद्या मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार नाही. आता निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी सर्व निवडणुकीचे एकत्रित निकाल जाहीर होणार आहे.

काय परिणाम होणार- Election Result Postponed

निकालाची तारीख पुढे ढकलल्यामुळे आता प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी चे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागतील. तसेच सर्व स्ट्रॉंग रूम मध्ये २१ डिसेंबर पर्यंत ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करणे, लक्ष्य ठेवावं लागेल. काही गडबड तर होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागेल.

Karad Bus Accident : कराडजवळ विद्यार्थ्यांची बस 20 फूट खड्ड्यात कोसळली; 40 जण जखमी

Karad Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Karad Bus Accident । सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. कराड तालुक्यातील वाठार गावात एक विद्यार्थ्यांच्या सहलीची बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून सर्वांच्या सर्व ४० प्रवासी जखमी झाले आहेत. यातील ५ जण अतिशय गंभीर जखमी आहेत. हे सर्व विद्यार्थी हे नाशिक जिल्ह्यातील आहेत. सहलीच्या निमित्ताने ते कराडच्या दिशेला आले होते. मात्र या सहलीला मोठं गालबोट लागलं आहे.

नेमकं काय झालं? Karad Bus Accident

सातारा कागल महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. महामार्गाच्या कामामुळे या संपूर्ण पट्ट्यात अनेक ठिकाणी गाड्या वळवण्यात येत असतात. नवनवीन उड्डाणपुलाची उभारणी सुरु असल्याने या भागात वाहतूक कोंडी सुद्धा रोजचीच झाली आहे. अनेक ठिकाणी बॅरिगेट्स आहेत. रस्त्याच्या बाजूने खुदाईचे काम सुरू आहे. यामुळे दररोज अपघात होत आहेत. तसाच अपघात आज वाठार हद्दीत पाहायला मिळाला. बस चालकाला रस्त्यावरील भलामोठा खड्डा दिसलाच नाही आणि नियंत्रणाबाहेर जाऊन बस २० फुटी खड्डयात पडली. अचानक मोठा आवाज आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, पिंपळगाव बसवंत या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहलीची हि बस होती. या बसमध्ये जवळपास ४० विद्यार्थी आणि शिक्षक होते.

अपघातानंतर (Karad Bus Accident) पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अपघाताची अन्य कोणती कारणे आहेत का याचाही तपास पोलीस घेत आहेत. परंतु प्राथमिक अंदाजानुसार, बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला असं बोललं जात आहे. जखमींना कराड येथीलच कृष्णा हॉस्पिटल मध्ये तातडीने दाखल करण्यात आलं आहे. यातील ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातंय. सहलीचा आनंद घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर क्षणात संकट कोसळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MHADA Nashik Lottery : स्वस्तात घर खरेदीची सुवर्णसंधी!! Mhada कडून नाशिकमध्ये 402 घरांसाठी लॉटरी

MHADA Nashik Lottery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MHADA Nashik Lottery । आजकाल घर खरेदी करणे काय खायचं काम नाही. खास करून शहरी भागात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशावेळी शहरात घर खरेदीचे अनेकांचे स्वप्न हे स्वप्नच राहतेय. परंतु आता चिंता करू नका. तुम्ही नाशिक मध्ये नवीन घर घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी हि बातमी अतिशय महत्वाची आहे. Mhada कडून नाशिकमध्ये 402 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांना स्वस्तात व परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध होणार आहेत.

कोणकोणत्या भागात घरे उपलब्ध – MHADA Nashik Lottery

म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे (MHADA Nashik Lottery) नाशिक भागातील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर शिवारातील विविध गृहनिर्माण प्रकल्पामधून घरं घेता येणार आहे. यातील ४०२ घरं आगाऊ अंशदान तत्त्वावर विकण्यासाठी लॉटरी काढली जाणार आहे. ही घरं १४ लाख ९४ हजार ते ३६ लाख ७५ हजारापर्यंत आहेत. त्यामुळे नाशिककरांना स्वस्त दरात आणि अतिशय कमी किमतीत घरं खरेदी करता येणार आहे. म्हाडाकडून काढण्यात येणारी घरे ही अॅडव्हान्स कंट्रिब्युशन तत्वावर आहेत. म्हणजेच ही घरे अजूनही बांधलेली नाहीत. लॉटरीत विजेत्या ठरलेल्या अर्जदारांना घरांची विक्री किंमत पाच टप्प्यांत भरता येणार आहे.

नाशिकमध्ये कुठे आणि किती घरं?

अल्प उत्पन्न गटासाठी…

चुंचाळे शिवार – १३८
पाथर्डी शिवार – ३०
मखमलाबाद – ४८
आडगाव – ७७

अशा एकूण २९३ घरांचा या लॉटरीत समावेश आहे.

मध्यम उत्पन्न गटासाठी

सातपूर – ४०
पाथर्डी – ३५
आडगाव – ३४

एकूण १०९ घर उपलब्ध (MHADA Nashik Lottery) आहेत. अर्जदारास 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा सादर करणे गरजेचं आहे. अर्जदाराचे आयकर विवरणपत्र अथवा तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र यातील एक उत्पन्न पुरावा ग्राह्य धरला जाईल.

Shahaji Bapu Patil : शहाजीबापू पाटील राजकारण सोडणार!! छापेमारीनंतर सांगोल्यात मोठ्या घडामोडी

Shahaji Bapu Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shahaji Bapu Patil । सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप या मित्रांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु असल्याच्या चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे शिंदेंचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणाऱ्या सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापेमारी पडल्याने खळबळ उडाली. निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने शहाजीबापू यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. यानंतर उद्दिग्न झालेल्या शहाजीबापुनी थेट राजकारण सोडण्याचीच टोकाची भूमिका मांडली आहे. तसेच याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करु असे ते म्हणाले. त्यामुळे सांगोल्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची शक्यता आहे.

काय म्हणाले शहाजीबापू पाटील ? Shahaji Bapu Patil

‘हे जे सगळं काही चाललं आहे ते चुकीच्या दिशेने राजकारण सुरू आहे. आज या परिस्थितीत माझ्या मनात राजकारण सोडून देण्याचा विचार येतोय. मी आता थांबण्याचा विचार करतोय, कारण अशा प्रकारचं राजकारण सांगोल्यात यापूर्वी कधीही झालं नाही. आजपर्यंतच्या माझ्या राजकीय कारकिर्दीत मी अनेक निवडणुका लढवल्या पण अशी कारवाई कधी झाली नाही.सांगोल्याच्या स्वाभिमानी जनतेने हे सगळ पहावं. या धाडीमागे सांगोला मधील माजी आमदार दीपक साळुंखे आणि पालकमंत्री आहेत. जय कुमार गोरे यांच्या हाताला धरून त्याने हे काम केलं आहे असा नाव घेऊन थेट आरोपच शहाजी पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावर आता जयकुमार गोरेंकडून काय प्रतिक्रिया येते ते पहायला हवं.

सांगोल्यात नेमकं काय घडतंय ?

एकीकडे महाराष्ट्रात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती असताना दुसरीकडे सांगोल्यात मात्र वेगळंच चित्र बघायला मिळतेय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी युती करत शहाजीबापूना (Shahaji Bapu Patil) खिंडीत गाठलं आहे. भाजप आणि शहाजीबापू यांच्यात यामुळे वादाची ठिणगी पडली. जयकुमार गोरे यांच्यावर शहाजीबापू यांनी शेलक्या शब्दात टीकाही केली होती. त्यातच काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगोल्यात सभा झाली होती. या सभेत फडणवीस यांनी बापूंवर कोणतीही टीका केली नसली तरी शेकाप बरोबर झालेल्या युतीमुळे आपल्याला आनंद झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे भाजपने शहाजीबापू पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम केला कि काय अशी चर्चा सांगोल्यात सुरु आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि शहाजीबापू पाटील यांच्या पक्षाचे सर्वोच नेते एकनाथ शिंदे याना या धाडीबद्दल विचारलं असता जी काही चौकशी होत आहे, त्यामध्ये काही गांभीर्याने घेण्यासारखं नाही, असे त्यांनी म्हटले.

LPG Gas Cylinder Price : गॅस सिलिंडर झाला स्वस्त; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन LPG Gas Cylinder Price । डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गॅस सिलिंडरच्या किमती आज स्वस्त झाल्या आहेत. . महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीत कपात केली आहे. कि कपात १० रुपयांची आहे. आणि सर्वात महत्वाच म्हणजे घरगुती गॅस नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स, भोजनालये आणि केटरिंग सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.

नवीन दरानुसार आता, १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर १५८०.५० रुपयांना मिळेल. कोलकातामध्ये १६८४ रुपये, मुंबईत १५३१ रुपये आणि चेन्नईमध्ये हाच गॅस सिलिंडर १७३९.५० रुपयांत उपलब्ध असेल. ही कपात जरी १० रुपयांची किरकोळ वाटतं असली तरी, दररोज मोठ्या प्रमाणात सिलिंडर वापरणाऱ्या व्यवसायांसाठी ही एक मोठी सवलत आहे. लग्न आणि सणांच्या काळात, जेव्हा अन्न आणि पेय व्यवसायांना सिलिंडरचा वापर वाढतो तेव्हा ₹१० ची कपात देखील मोठा फरक करत असते . LPG Gas Cylinder Price

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती जैसे थे – LPG Gas Cylinder Price

एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल झाला असला तरी दुसरीकडे तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती जैसे थे ठेवल्या आहेत. याचा अर्थ ग्राहकांना त्यांच्या घरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजीसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. देशभरातील प्रमुख शहरांमधील घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती खालीलप्रमाणे आहेत:

दिल्ली: ८५३ रुपये

मुंबई: ८५२.५० रुपये

लखनऊ: ८९०.५० रुपये

वाराणसी: ९१६.५० रुपये

अहमदाबाद: ८६० रुपये

हैदराबाद: ९०५ रुपये

पाटणा: ९५१ रुपये

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये चढ-उतार का होतात?

व्यावसायिक एलपीजी घरगुती सिलिंडरपेक्षा वेगळे सूचीबद्ध केले जाते. हे अनुदानित उत्पादन नाही, म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदल थेट त्याच्या किमतींवर परिणाम करतात. हॉटेल्स आणि अन्न उद्योग या गॅसचा वापर करतात, म्हणून कोणत्याही किंमतीतील बदलाचा त्यांच्या संपूर्ण व्यवसाय खर्चावर परिणाम होतो.

Gold Price Today : सोन्याच्या दरात प्रचंड वाढ; थंडीतही ग्राहकांना फुटला घाम

Gold Price Today 29 NOV

Gold Price Today : मागील दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोने- चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ बघायला मिळाली. भारतीय सराफा बाजारात आज २९ नोव्हेंबर २०२५ रोजी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याच्या भाव 126920 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 1.13% म्हणजेच 1416 रुपयांची भरभक्कम वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती दररोज बदलतात. आज सोने सव्वा लाखाच्या पार गेल्याने भर थंडीतही खरेदीदार ग्राहकांना घाम फुटत आहे.

खरं तर MCX वर आज सोन्याचा व्यवहार 125729 रुपयांवर उघडला जो मागील बाजारात 125504 रुपयांवर बंद झाला होता. मार्केट उघडल्या पासूनच सोन्याच्या किमती वर वर जाताना दिसल्या. सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोने 126920 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत तर तब्बल 9055 रुपयांची वाढ झाली आहे. मार्केट मध्ये सध्या एक किलो चांदी 171522 रुपयांवर व्यवहार करत आहे. चांदीची हि सध्याची किंमत आत्तापर्यंतची सर्वात जास्त किंमत आहे. Gold Price Today

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 119000 रुपये
मुंबई – 119000 रुपये
नागपूर – 119000 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 129820 रूपये
मुंबई – 129820 रूपये
नागपूर – 129820 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.

Raj Thackeray On Nashik Tree Cutting : साधूंच्या नावाखाली तपोवन उद्योगपतींच्या घशात…; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

Raj Thackeray On Nashik Tree Cutting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Raj Thackeray On Nashik Tree Cutting । नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या परार्श्वभूमीवर साधूंसाठी साधूग्राम उभारण्याची सरकारची योजना असून त्यासाठी नाशिकच्या तपोवनामधली सुमारे 1800 झाडे तोडण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याविरोधात नाशिककर आणि इतर पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या मुद्यावरून वातावरण तापलेलं आहे. आता यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली असून सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये अशी टीका राज ठाकरे यांनी केली. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी – Raj Thackeray On Nashik Tree Cutting

आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा, नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ?

बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो. आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत ! Raj Thackeray On Nashik Tree Cutting

नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच !

राज ठाकरे

Pune Metro : पुणेकरांना मिळणार नवीन मेट्रो; कुठून कुठपर्यंत धावणार

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro। पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी मागील काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा २ मेट्रो चालवल्या जात आहेत. पुणेकरांचा सुद्धा मेट्रोला प्रचंड प्रतिसाद मिळत असून यामुळे महत्वाचं म्हणजे वेळेची सुद्धा बचत होताना दिसतेय. आता पुणेकरांसाठी लवकरच एक नवीन मेट्रो ट्रेन सुरु होणार आहे. हि मेट्रो खराडी ते पुणे एअरपोर्टपर्यंत धावेल. त्यामुळे पुणेकरांसाठी विमानतळावर जाणे अधिक सोप्प होईल.

डीपीआरवर काम सुरु – Pune Metro

सध्या पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर आणि खराडी ते खडकवासला अशा २ मेट्रोचे (Pune Metro) काम सुरु आहे, आता खराडी ते पुणे एअरपोर्ट असा मेट्रो मार्ग तयार करण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी एक डीपीआर तयार करायला सांगितला आहे. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी दिली. महा मेट्रो आणि पुणे महापालिका सामूहिकरीत्या या डीपीआरवर काम करत आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मार्गिका क्रमांक 4 – खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व मार्गिका क्रमांक 4 अ नळस्टॉप – वारजे – माणिकबाग या दोन मार्गिकांना मंजुरी देण्यात आली आहे. या दोन नवीन 31.6 किलोमीटर अंतराच्या दोन विस्तारित मार्गिकांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्या मार्गावर एकूण 28 स्थानके विकसित केली जाणार असून यासाठी 9857 कोटी 85 लाख रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. येत्या ५ वर्षात हे काम पूर्ण होईल असं बोललं जात आहे.

पुणेकरांसाठीच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांना मान्यता दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचेही मी आभार मानतो, असेही मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटल.

ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यातील जागाच मनसे मागतेय? राज – उद्धव भेटीची Inside Story

Raj Uddhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली . दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीत तब्बल दीड तास चर्चा झाल्याचं बोललं जाते. या चर्चेदरम्यान आगामी मुंबई महापालिका निवडणूक हाच मुख्य अजेंडा होता . या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधूंनी जागा वाटपावर बोलणी केल्याचं समोर आलं आहे. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या अनेक जागा मनसेने मागितल्याचे बोलले जाते. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंची चांगलीच गोची झाली आहे.

मनसेचा कोणत्या जागांवर दावा

उद्धव ठाकरे असो व राज ठाकरे दोघांची मुंबईतील ताकद एकच आहे ती म्हणजे मराठी माणूस….. त्यामुळे ज्या भागात मराठी माणसाची संख्या जास्त आहे अशा भागांवर दोन्ही पक्षाचे वर्चस्व आहे. हेच वर्चस्व टिकवण्यासाठी जास्तीत जास्त मराठीबहुल जागांवर लढण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न नाही. आणि इथेच नेमका जागा वाटपाचा तिढा निर्माण होतोय. मराठीबहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही आहे. एवढच नव्हे तर उद्धव ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांचीही मनसेकडून मागणी केली जात आहे. याशिवाय ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही असल्याची माहिती आहे.

दादर माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठीबहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये रस्सीखेच सुरु आहे. नसेने कितीही जागा मागितल्या तरी मनसेची संबंधित प्रभागातील संघटनात्मक ताकद, तगडा उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम आहे. त्यामुळे कोण कुठून लढणार? याबाबत ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये काल ठोस तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही बंधुंमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या अपेक्षित आहेत. निवडून येवू शकणाऱ्या एकेका जागांवर सखोल चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात होत आहे.